१० मिनिटांच्या 'सदिच्छा' भेटीत शरद पवार राऊतांना 'हे' म्हणाले!

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट केवळ 'सदिच्छा' भेट होती, असा दावा राऊत यांनी केला आहे.
Sharad Pawar - Sanjay Raut
Sharad Pawar - Sanjay Raut

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट केवळ 'सदिच्छा' भेट होती, असा दावा राऊत यांनी केला आहे.

आज दुपारी साडेबारा वाजता पवार माध्यमांशी बोलणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीबाबत उत्सुकता होती. राऊत अवघ्या दहा मिनिटांमध्ये ही भेट आटोपून सिल्व्हर ओकच्या बाहेर आले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांच्याशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. शरद पवार यांनी राज्यातल्या अस्थिर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. यावर पवार यांची भूमीका ठाम आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com