शिवसेना वाटाघाटीत राष्ट्रवादीला ठरली भारी! अजितदादांचे गृहमंत्रिपदाचे स्वप्न अधुरे...

राष्ट्रवादी काॅंग्रेसने गृह खाते इतक्या सहजासहजी का सोडले असावे, असा प्रश्न पुढील काळात चर्चेत राहणार आहे. कारण 1999 ते 2014 या पंधरा वर्षांत याच पक्षाकडे हे खाते होते.
shivsena retains home portfolio
shivsena retains home portfolio

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तीन पक्षांच्या महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात राष्ट्रवादी काॅंग्रेसने गृह खाते सोडले असून या खात्यासह नगरविकास हे तगडे खाते आपल्याकडे ठेवण्यात शिवसेनेने यश मिळविले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे गृह खाते जाणार, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात शिवसेनेने हे खाते आपल्याकडे ठेवले आहे. हे खाते सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय नगरविकास खातेही त्यांच्याकडेच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी सध्या आपल्याकडे कोणतेच खाते घेतलेले नाही.

राष्ट्रवादीने ग्रामविकास, जलसंपदा, अर्थ, राज्य उत्पादन शुल्क, सामाजिक न्याय ही खाती ठेवली आहेत. सहकार हे राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे असलेले खाते त्याच पक्षाकडे राहिले आहे. 

क्र.    मंत्री महोदयांची नावे    खात्याची नावे
1.    श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे- मुख्यमंत्री    कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.
2.    श्री. एकनाथ संभाजी  शिंदे -   गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.
3.    श्री. छगन चंद्रकांत भुजबळ -    ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
4.    श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात-   महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.
5.    श्री. सुभाष राजाराम देसाई-    उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.
6.    श्री. जयंत राजाराम पाटील -   वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.
7.    डॉ. नितीन काशिनाथ राऊत-    सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com