कॉंग्रेसने  संभाव्य मंत्र्यांची नावे लवकर  द्यावीत म्हणून सेनेचे  शरद पवारांना साकडे 

मंत्रीपदासाठी काँग्रेसने अद्याप नावे पाठवलेली नाहीत. थोरात यांनी त्यासंदर्भात पक्षाचे नेते राहुल गांधींशी संपर्क केला आहे असे सांगितले जाते. गेल्या वेळी कॉंग्रेसची नावे आली नव्हती. त्यामुळे यावेळी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत सेनेतील उच्चपदस्थांनी व्यक्त केले आहे.
Shivsena Requests Sharad Pawar to Expedite for Congress Names in Ministry
Shivsena Requests Sharad Pawar to Expedite for Congress Names in Ministry

मुंबई :  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 30 डिसेंबरला होणार हे निश्‍चित झाले असल्याने कॉंग्रेसने त्यांच्या मंत्रीसदस्यांची नावे कळवावीत, असे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना शिवसेनेने कळवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महसूलमंत्री कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संवाद साधला. 

कॉंग्रेसने अद्याप नावे पाठवलेली नाहीत. थोरात यांनी त्यासंदर्भात पक्षाचे नेते राहुल गांधींशी संपर्क केला आहे असे सांगितले जाते. गेल्या वेळी कॉंग्रेसची नावे आली नव्हती. त्यामुळे यावेळी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत सेनेतील उच्चपदस्थांनी व्यक्त केले आहे. आघाडी सरकारमध्ये खबरदारीची उपायोजना म्हणून कायम सतर्क संवाद राखणे बरे असे मत व्यक्त केले जाते.

पवारसाहेबांनी बोलावे, असे त्यामुळेच सांगितल्याचे सेनेतून समजते. कॉंग्रेसमधील बड्या नेत्यांनीही विस्ताराबाबत दिल्ली म्हणेल ती नावे निश्‍चित होतील, अशी भूमिका घेतली आहे. यासंबंधात प्रदेशाध्यक्षच माहिती देवू शकतील असेही सांगितले जात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com