येवल्यात शिवसेनेने अव्हेरला छगन भुजबळांचा प्रस्ताव

येवला पंचायत समितीत सभापतिपदासाठी आरक्षणाचा उमेदवार नसल्याने सभापतींची निवडणूक स्थगीत झाली. उपसभापतीपदी शिवसेनेच्या लक्ष्मीबाई गरुड यांची निवड झाली. यावेळी ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात शिवसेनेने राष्ट्रवादीला जवळही फिरकू दिले नाही.
Shivsena Rejected Chagan Bhujbal Proposal in Yeola Panchayat Committee
Shivsena Rejected Chagan Bhujbal Proposal in Yeola Panchayat Committee

नाशिक : येवला पंचायत समितीत सभापतिपदासाठी आरक्षणाचा उमेदवार नसल्याने सभापतींची निवडणूक स्थगीत झाली. उपसभापतीपदी शिवसेनेच्या लक्ष्मीबाई गरुड यांची निवड झाली. यावेळी ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात शिवसेनेने राष्ट्रवादीला जवळही फिरकू दिले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोहन शेलार उपसभापतिपदाची निवडणूक लढविली. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तणावाची स्थिती आहे.

येवला पंचायत समितीत दहापैकी सात सदस्य शिवसेनेचे, तर तीन सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. उद्या (ता.2) जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक आहे. त्यात हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. महाविकास आघाडीच्या धोरणानुसार शिवसेनेचा अध्यक्ष निश्‍चित आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना पुर्ण सहकार्य केले आहे. त्यासाठी स्वतः ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ आज नाशिकला आले आहेत. ते स्वतः जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र त्यांच्या गृह मतदारसंघातच या दोन्ही पक्षांत विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे.

काल झालेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणूकीत संकेतानुसार सभापती शिवसेनेचा तर उपसभापती राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अपेक्षीत होता. अध्यक्षपदी आरक्षीत गटातील सदस्य नसल्याने ती निवडणूक स्थगित झाली. ती येत्या आठवड्यात अपेक्षीत आहे. मात्र उपसभापतीपदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा ठोकला होता. त्यासाठी स्वतः छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या तीन सदस्यांशी दुरध्वनीवरुन संपर्क केल्याचे बोलले जाते. मात्र त्यांनी ऐनवेळी पक्षाच्या सदस्यालाच मतदान केले. 

यामध्ये येवला तालुक्‍याचे नेते संभाजी पवार व विधान परिषद सदस्य नरेंद्र दराडे यांच्याशी भुजबळ यांनी चर्चा करावी किंवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुचना याव्यात अशी भूमिका घेण्यात आली. तासभर खलबते झाली. मात्र अंतिमतः शिवसेनेने राष्ट्रवादीला जुमानले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या लक्ष्मीबाई गरुड निवडून आल्या. राष्ट्रवादीचे मोहन शेलार यांचा पराभव झाला. यातुन राज्यात दोन्ही पक्ष एकत्र असले तरीही खुद्द भुजबळांच्या मतदारसंघातच त्यांच्यात एकवाक्‍यता अवघड असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com