शिवसेना 126 जागावर युतीला तयार  !

..
thakrey_Fadanvis
thakrey_Fadanvis

मुंबई : युतीचा फॉर्म्युला निश्‍चीत झाला असून भाजप व मित्र पक्ष 162 तर शिवसेना 126 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहीती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या अटी व शर्थीवर भारतीय जनता पक्षाने युती केली. त्याचवेळी विधानसभेत देखील युती करण्याचा शब्द भाजपने उध्दव ठाकरे यांना दिला. मात्र, जागावाटपाचे सुत्र निश्‍चित करण्यात आले नव्हते.

आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधे जागवाटप व जागांच्या अदलाबदली बाबत सविस्तर चर्चा झाली असताना भाजपने शिवसेनेला 105 पेक्षा जास्त जागा देता येणार नाहीत असा पवित्रा घेतला होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे . 

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात समन्वयाने जागावाटपाचे सुत्र निश्‍चीत झाल्याची माहीती आहे. शिवसेनेला 135 व भाजपला 135 असा फॉर्म्युला शिवसेनेचा होता मात्र, तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य नव्हता. त्यामुळे, युतीच्या चर्चेत खिळ बसली होती.

अखेर भाजपने 105 ऐवजी शिवसेनेला 126 जागा देण्याची तयारी दर्शविली. उध्दव ठाकरे यांना162 : 126 हे सुत्र मान्य झाले असल्याचे समजते . 

दरम्यान 2014 ला भाजप शिवसेना स्वबळावर लढल्यानंतर भाजपची राज्यातील ताकद वाढली आहे. त्याअगोदर शिवसेना 171 तर भाजप 117 जागांवर निवडणूक लढवत होते.

आता शिवसेनेला  126 जागा देवून भाजप मोठ्‌या भावाच्या भूमिकेत विधानसभेला सामोरे जाणार असल्याचे निश्‍चीत झाल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com