Shivsena Raigad District Chief Resigns | Sarkarnama

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांचा राजिनामा : सामान्य शिवसैनिक म्हणून काम करणार

अमित गवळे 
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा राजिनामा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे नुकताच दिला आहे. देसाई यांनी अचानक राजीनामा दिल्याने जिल्हा शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे.

पाली : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा राजिनामा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे नुकताच दिला आहे. संघटनेस अभिप्रेत वेळ देऊ शकत नसल्याचे कारण राजिनामा पत्रात त्यांनी दिले आहे.

देसाई यांनी अचानक राजीनामा दिल्याने जिल्हा शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिलेल्या राजिनामा पत्रात प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे की संघटनेसाठी मला अभिप्रेत असलेला वेळ मी देवू शकत नाही अशी माझी मानसिकता झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे. संघटनेमध्ये कुठलेही वादविवाद नाहीत. तशा स्वरूपाचे कुठलाही निष्कर्ष काढू नयेत. 

मी राजिनामा दिला असला तरी भविष्यात मी एक शिवसैनिक म्हणून काम करण्यात धन्यता मानणार असल्याचे देसाईंनी स्पष्ट केले आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यावर काय भुमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मी केलेल्या कामाची योग्य दखल घेवून मला जिल्हाप्रमुख पदावर थेट नेमले, त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचा नेहमीच ऋणी आहे. त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी देखिल संघटना वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलली. शिवसेना पक्षप्रमुखांचा शिवसैनिक या नात्याने भविष्यात काम करण्याचा निश्चय केला आहे.   
- प्रकाश देसाई, पाली
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख