१४ जागा सांगा कुठल्या हव्यात ते तर सांगा : शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव 

भाजपचे आज १२३ आमदार आहेत तर सेनेचे ६३ .मित्रपक्षांनी निवडून येण्याची शाश्वती एकदोन ठिकाणीच असल्याने त्यांना परिषदेवर संधी देण्याचे सेनेचे मत आहे.१४४ मतदारसंघ दोघांनीही लढावे हे गृहित धरत भाजपला हव्या असलेल्या जागा कळ ल्या तर वाटप सोपे होईल असे कळवण्यात आले आहे
१४ जागा सांगा कुठल्या हव्यात ते तर सांगा : शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव 

मुंबई : समसमान सत्ता या सुत्राचा आदर करण्याच्या आणाभाका घेत जागावाटप चर्चेला प्रारंभ करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निश्चित केला असून भाजपने त्यांना हवे असलेल्या १४ ते १८ मतदारसंघांची यादी पाठवावी असे शिवसेनेने सुचवले आहे. 

भाजपचे आज १२३ आमदार आहेत तर सेनेचे ६३ .मित्रपक्षांनी निवडून येण्याची शाश्वती एकदोन ठिकाणीच असल्याने त्यांना परिषदेवर संधी देण्याचे सेनेचे मत आहे.१४४ मतदारसंघ दोघांनीही लढावे हे गृहित धरत भाजपला हव्या असलेल्या जागा कळ ल्या तर वाटप सोपे होईल असे कळवण्यात आले आहे. एमटीएन एलला लागलेल्या आगीमुळे मातोश्रीची दूरध्वनी सेवा बंद असली तरी फडणवीस व उद्धवजी यांनी फेसटाईम मार्फत गेल्या दोन दिवसात दोनदा संपर्क साधला असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. भाजपला पाठिंबा देणार्या अपक्षांची संख्या धरून त्यांना किती मतदारसंघ हवेत याबाबत सेनेला माहिती हवी आहे.

पुणे ,नागपूर या नागरी भागात सेनेची ताकद नाही.भाजपने सर्व जागा जिंकल्या आहेत.त्या मागायच्या नाहीत असा सेनेचा मनसुबा आहे.नाशिक येथे भाजपवर नाराज असलेले आमदार तसेच ठाणे शहर या जागा मागण्याचाही सेनेचा मानस आहे.आदित्य यांच्या यात्रेबद्दल भाजपने व्यक्त केलेल्या आक्षेपांवरही सविस्तर विचार झाला आहे.सेनेला भाजपची बरोबरी करण्यासाठी तब्बल ६० मतदारसंघांत तयारी करायची असल्याने भाजपचे मत जाणून घेण्यास प्राधान्य आहे.

दरम्यान भाजपने या सुचनेवर विचार सुरू केला आहे.आपल्याला हवे असलेले मतदारसंघ कोणते यावर काल रात्री फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ,सुधीर मुनगंटीवार आणि संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी विचार केला आहे.आज शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यातील संवादाची माहिती आज देसाई यांनी रात्री उशीरा उद्धव यांना दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com