`महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ, हे माझं वचन आहे'

"आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने हा वचननामा महाराष्ट्राच्या जनेतेच्या चरणी समर्पित केलेला आहे. शिवसेना आणि भाजप दोघे मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे सरकार चालवू आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ हे माझं वचन आहे," असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननाम्याचे प्रकाशन करताना सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमु्ख आदित्य ठाकरे वचननामा 2019 चे प्रकाशन करताना. (छायाचित्र सौजन्य : ट्विटर)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमु्ख आदित्य ठाकरे वचननामा 2019 चे प्रकाशन करताना. (छायाचित्र सौजन्य : ट्विटर)

पुणे - "आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने हा वचननामा महाराष्ट्राच्या जनेतेच्या चरणी समर्पित केलेला आहे. शिवसेना आणि भाजप दोघे मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे सरकार चालवू आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ हे माझं वचन आहे," असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननाम्याचे प्रकाशन करताना मुंबईत सांगितले.

राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा आम्ही बनवलेला आहे, पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे. यातलं एकही वचन खोटं ठरणारं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वचननाम्यातील विविध मुद्द्यांवर बोलताना ठाकरे म्हणाले, की 10 रुपयांत दिले जाणारे सकस जेवण स्वच्छ आणि व्यवस्थित असेल. त्यामध्ये विशेषत: एका किचनमधून वितरण आम्ही केले तरी महिला बचत गटांतील महिला त्यामध्ये सामावून घेतल्या जातील. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत, त्यांना एका रुपयांत आरोग्यचाचणी आम्ही करतो."

"गटप्रवर्तिका आहेत त्यांचं मानधन आम्ही वाढवणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही योजना आणलेली आहे, शिक्षणाबद्दल आमच्या योजना आहेत. घरगुती वापरातील वीज ३०० युनिट पर्यंत आम्ही ३० टक्क्यांनी दर कमी करणार असं म्हटलेलं आहे. दुर्बल घटक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष १०००० रुपये देणार, हे सगळं करताना अत्यंत जबाबदारीने विचार केलेला आहे, असे त्यांनी नमूद केले.

या वेळी बोलताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले, ``हा वचननामा बनवताना ५ वर्षांचा आपला जो काही फिरण्याचा अनुभव, लोकांशी चर्चा आणि लाखो लोकांचे प्रश्न घेऊन जन आशीर्वाद यात्रेत आणि दुष्काळी दौऱ्यात लोकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांचे एकत्रीकरण आणि संकलन करून वचननामा बनवलेला आहे.''

शालेय शिक्षणासाठी गावापासून महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी बसेस नाहीत, त्यांच्यासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात येईल. आम्ही ५०००० किलोमीटरचे असे रस्ते काढले आहेत जे गावापासून तालुक्यापर्यंत जातात, ते बारमाही टिकतील असे रस्ते आम्ही बनवणार आहेत. जशी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहे, तशीच मुख्यमंत्री शहर सडक योजना बनने गरजेचे आहे. यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com