shivsena plans for power show in ayodhya | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

अयोध्येत शिवसेनेचा आवाज घुमलाच पाहिजे : ठाकरे यांचा आदेश

संजय मिस्किन
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

मुंबई : राम मंदिराच्या बांधणीला विलंब होत असताना शिवसेनेने मात्र आक्रमक होत कट्‌टर हिंदुत्वाचा अजेंडा समोर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याने तिथे शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेचा आवाज घुमलाच पाहीजे, असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन मधे झालेल्या बैठकीत दिले.

मुंबई : राम मंदिराच्या बांधणीला विलंब होत असताना शिवसेनेने मात्र आक्रमक होत कट्‌टर हिंदुत्वाचा अजेंडा समोर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याने तिथे शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेचा आवाज घुमलाच पाहीजे, असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन मधे झालेल्या बैठकीत दिले.

आज झालेल्या या बैठकीलारा ज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांसह नेते, मंत्री, खासदार उपस्थित होते. यावेळी अयोध्या दौऱ्याचे नियोजन काटेकोर व शिस्तबद्ध होईल यासाठीची रणनिती आखण्यात आली.
 
राज्यभरातून मोठ्‌या संख्येने शिवसैनिक अयोध्येला रवाना होतील, यासाठी स्थानिक नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले. यासाठी शिवसेना भवन मधे नाव नोंदणीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय, नियोजन व नियंत्रणसाठी लखनौ व अयोध्येतही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
 
या दौऱ्याच्या संयोजनाची संपुर्ण जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आजच्या बैठकीत बोलताना राऊत म्हणाले की, संपुर्ण उत्तर प्रदेश ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत उत्सुक आहे. अयोध्येतील साधू, संत, महंत देखील ठाकरे यांची चातकासारखी वाट पाहत आहेत. त्यामुळे, या दौऱ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत. सर्व शिवसैनिक शांततेच्या मार्गानेच अयोध्येत दाखल होतील. यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
 
मुंबईतून सर्वाधिक शिवसैनिक अयोध्येला रवाना होणार आहेत. त्यासाठीचे नियोजन आजच्या बैठकीत आखण्यात आले. तर, महाराष्ट्रातून व इतर राज्यातूनही शिवसैनिकांचे जथे अयोध्येत पोहचणार आहेत. त्यामुळे ठाकरे यांचा अयोध्य दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला शह देण्याची सर्वोतोपरी तयारी सुरू केल्याचे मानले जाते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख