बाळासाहेब ठाकरे कुणाचे? मनसेने प्रतिमा वापरण्यास शिवसेनेचा विरोध

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भगवा झेंडा आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना हिंदुहृदयसम्राट उपाधी दिली आहे. मनसेचे पदाधिकारी समाज माध्यमांवर राज ठाकरे यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची छायाचित्रे वापरून पोस्ट्‌स टाकत आहेत. त्याला शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे
Shivsena Opposing MNS for using Balasaheb  Thackeray Images
Shivsena Opposing MNS for using Balasaheb Thackeray Images

मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा बदलून हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतर आता शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्यास सुरुवात केली आहे. त्याला शिवसेनेने आक्षेप घेतल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची दाट शक्‍यता आहे. या प्रकरणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भगवा झेंडा आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना हिंदुहृदयसम्राट उपाधी दिली आहे. मनसेचे पदाधिकारी समाज माध्यमांवर राज ठाकरे यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची छायाचित्रे वापरून पोस्ट्‌स टाकत आहेत. त्याला शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आपले छायाचित्र न वापरण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यानंतर राज यांनी बाळासाहेबांचे छायाचित्र मनसेच्या मंचावर आणि कार्यक्रमांत वापरले नव्हते.

राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा 'अजेंडा' घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये जाणीवपूर्वक वापरले जात असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्ते करत आहेत. त्यावरून मनसे आणि शिवसेना यांच्यात समाज माध्यमांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. शिवसेना त्यांचा नोंदणीकृत पक्ष आहे. त्यांची प्रतिमा इतर कोणताही पक्ष फलकांवर किंवा झेंड्यावर वापरू शकत नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेने मनसेविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

बाळासाहेबांना दैवत संबोधणारे त्यांना सोडून का गेले? त्यानंतर त्यांच्या प्रतिमेची गरज का पडली? मनसेचे हे बेरकी प्रेम आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून कायदेशीर कारवाईचा विचार करू - मनीषा कायंदे, आमदार, शिवसेना.

मनसे स्थापन झाल्यापासून राजकारणासाठी आम्ही कधीही बाळासाहेबांची प्रतिमा वापरलेली नाही. कुणी पदाधिकारी समाज माध्यमांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचा वापर करत असल्यास मला माहीत नाही. त्याबाबत माहिती घेतली जाईल - अविनाश अभ्यंकर, नेते, मनसे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com