युती असो अथवा नसो जिंकायचेय हेच शिवसेनेने ध्येय : रवींद्र मिर्लेकर 

 युती असो अथवा नसो जिंकायचेय हेच शिवसेनेने ध्येय : रवींद्र मिर्लेकर 

पिरंगुट (जि.पुणे), ता. 8 : " युती असो अथवा नसो राज्यात भगवा फडकणारच. आम्हीही सर्व जागांसाठी तयारी करतोय. युती असो अथवा नसो जिंकायचेय हे ध्येय ठेवलेले असा निर्धार शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी आज येते केला. 

शिवसेनेच्या भोर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच शिवसैनिकांसाठी घोटावडे फाटा ( ता.मुळशी) येथील सुंदरबन मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यात मिर्लेकर बोलत होते. ते म्हणाले,"" ज्या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसने सगळ्यांना कायम गुलामगिरीत ठेवले ती गुलामगिरी मोडून काढा. त्यामुळे विनाकारण हात दाखवून अवलक्षण करू नका. ' 

मेळाव्याचे आयोजन जिल्हा सहसंपर्क प्रमुख मुळशी पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांनी केले होते. यावेळी सत्यवान उभे, मिलिंद हांडे, बाळा कदम , रमेश कोंडे , कुलदीप कोंडे , दत्तात्रय टेमघरे, आत्माराम कलाटे, संगीता पवळे, स्वाती ढमाले, संतोष मोहोळ आदी उपस्थित होते. 

सत्यवान उभे म्हणाले , " धनुष्यबाण हाच उमेदवार समजून सर्वांनी भोरच्या विजयाचे साक्षीदार व्हा " बाळासाहेब चांदेरे म्हणाले , " आमदार म्हणून निवडून आल्यावर संग्राम थोपटे यांनी पहिले काम केले ते आमसभा बंद करण्याचे. भोर येथील सार्वजनिक जागा थोपटे कुटुंबाने स्वतःच्या संस्थांसाठी वापरली.' राम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com