गणेश नाईकांना शिवसेना नगरसेवकांचा विरोध;निवडणुकीचे काम करण्यास नकार

गणेश नाईकांमागे लागलेले शुक्लकाष्ट सुटण्याचे नाव घेत नाही. राज्यातून राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर महापालिकेतील सत्तेच्या जोरावर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या गणेश नाईकांच्या वाटेत नव-नवे अडथळे उभे राहत आहेत. पुत्र संदीप नाईक व पुतण्या सागर नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर तब्बल एक महिना लोटूनही नाईकांच्या भाजप प्रवेशाचे भवितव्य अद्याप अधांतरीतच आहे.
Navi Mumbai Shivsena Corporators Opposed To Work For Ganesh Naik
Navi Mumbai Shivsena Corporators Opposed To Work For Ganesh Naik

नवी मुंबई : सतत लांबणीवर पडत चाललेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखिन एक नवीन अडचण उभी राहीली आहे. नवी मुंबईतील शिवसनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांना तिव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणुकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नकार दिला आहे. रविवारी वाशीतील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झालेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सर्व नगरसेवकांनी एकमुखाने नाईकांचे काम न करण्याचा निर्धार केला आहे. 

नाईकांमागे लागलेले शुक्लकाष्ट सुटण्याचे नाव घेत नाही. राज्यातून राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर महापालिकेतील सत्तेच्या जोरावर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या गणेश नाईकांच्या वाटेत नव-नवे अडथळे उभे राहत आहेत. पुत्र संदीप नाईक व पुतण्या सागर नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर तब्बल एक महिना लोटूनही नाईकांच्या भाजप प्रवेशाचे भवितव्य अद्याप अधांतरीतच आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेल्या ९ तारखेच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त हुकल्यानंतर आता ११ सप्टेंबरला गणेश नाईक समर्थकांसहीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 

परंतु, त्याआधीच नवी मुंबईतील नाईकांचे शिवसेनेच्या कडव्या विरोधकांनी दंड थोपाटले आहेत. रविवारी वाशीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत ज्यांनी शिवसेना संपवली त्यांचे काम निवडणूकीत करणार नाही अशी कठोर भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली. नगरसेवकांच्या या भूमिकेबाबत शिवसेनेच्या जिल्हापातळीवरील वरिष्ठ नेत्यांनीही सकारात्मक माना डोलवत पाठींबा दिला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली, घणसोली व कोपरखैरणेत बहुतांश महत्वांच्या प्रभागावर शिवसेनेच्या नगरसेवकांची पकड मजबूत आहे. त्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थितीत निवडणुकीपर्यंत राहील्यास भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.   

नाही तर सामुहीक राजीनामे देणार
शिवसेना नगरसेवकांनी वाशीत झालेल्या बैठकीत घेतलेला निर्णय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंमार्फत मातोश्रीवर पोहचवला जाणार आहे. नाईकांचा प्रवेश करून उमेदवारी दिल्यास नवी मुंबईतून शिवसेना कशी संपेल हे समजावून सांगितले जाणार आहे. परंतु, त्यानंतरही मातोश्रीने नाईकांच्या प्रवेशाबाबत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा न केल्यास सामुहीक राजीनामे देण्याची धमकी नगरसेवकांनी दिली आहे.

एक मतदार संघ शिवसेनेला
नवी मुंबईत ऐरोली व बेलापूर असे दोन विधानसभा मतदार संघ आहेत. युतीच्या जुन्या फॉर्मुल्याप्रमाणे ऐरोली मतदार संघ शिवसेनेला तर बेलापूर मतदार संघ भाजपला दिला जातो. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेना व भाजप स्वबळावर लढल्यामुळे दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभा केला होता. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत युतीच्या उमेदवाराला नवी मुंबईतून तब्बल ९० हजार मतांची आघाडी मिळाली होती. हे मताधिक्य पाहता विधानसभानंतर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे उज्वल भवितव्य आहे. परंतु, मध्येच नाईक कुटुंबियांच्या प्रवेशामुळे दोन्ही मतदार संघ नाईकांना जातील, अशी भिती शिवसेनेच्या नगरसेवकांना वाटत आहे. त्यामुळे एक मतदार संघ शिवसेनेला सोडण्याची ठोस मागणी नगरसेवकांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com