चंद्रकांत पाटील यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही : शिवसेनेची भूमिका

चंद्रकांत पाटील यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही : शिवसेनेची भूमिका

पंढरपूर : सांगली, कोल्हापूर भागातील पूरपरिस्थिती हाताळण्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अपयशी ठरले होते. सध्याचे राज्य सरकार काळजीवाहू सरकार आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा त्यांच्या हस्ते न करता राज्यपाल अथवा वारकरी भक्ताकडून करावी. पाटील यांना शिवसेना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे यांनी दिला. त्यांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीला या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे. 

8 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. केंदळे यांनी मंदिर समितीला दिलेल्या लेखी निवेदनात असे नमूद केले आहे की, चंद्रकांत पाटील हे सध्याच्या काळजीवाहू सरकारमधील काळजीवाहू मंत्री आहेत. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा त्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री.पाटील कोल्हापूर, सांगली भागातील पूरपरिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले. पूरग्रस्तांना ठोस अशी कोणतीही मदत झाली नाही. पंढरपूर मधील अनेक पूरग्रस्त अजून शासकीय मदती पासून वंचित आहेत. पीक विम्याचे पंचनामे आणि शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अद्यापपर्यंत किती जणांना मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. अशा परिस्थितीत श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्यपाल अथवा वारकरी भक्ताकडून करावी. पाटील यांना शिवसेना श्री विठ्ठलाची महापूजा करु देणार नाही असा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक केंदळे यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com