Shivsena MP Vinayak Raut Answers Narayan Rane Criticism
Shivsena MP Vinayak Raut Answers Narayan Rane Criticism

नारायण राणेंच्या पनवतीमुळे फडणवीसांची गाडी घसरली : विनायक राऊतांचे राणेंना प्रत्युत्तर

सरकार स्थापन होऊन दहा दिवस झाले आहेत. या सरकारने फक्त स्थगिती देण्याचे काम केले आहे. ठेकेदारांकडून पैसे उकळले जात आहेत. बाळासाहेबांचे हिंदुत्व शिवसेना विकते आहे, अशा स्वरुपाची गंभीर टीका खासदार नारायण राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली होती. त्याला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

रत्नागिरी : ''नारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली. आज राऊत आमच्या सरकारला शाप देत आहेत. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते,'' असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना लगावला आहे. 

सरकार स्थापन होऊन दहा दिवस झाले आहेत. या सरकारने फक्त स्थगिती देण्याचे काम केले आहे. ठेकेदारांकडून पैसे उकळले जात आहेत. बाळासाहेबांचे हिंदुत्व शिवसेना विकते आहे, अशा स्वरुपाची गंभीर टीका खासदार नारायण राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली होती. त्याला राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. 

या बाबत बोलताना शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले, "राणेंची दखल घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, अशी मराठीत म्हण आहे. त्यानुसार राणेंच्या शापांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला कुठलाही धोका होणार नाही. नारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली. त्यामुळे नारायण राणेंनी ते सावरता येते का ते पहावे. नाही तर पुढचा विचार जरुर करावा.''

ते पुढे म्हणाले, "आयुष्यभर ज्यांनी ठेकेदारी केली, दमदाटी करुन पैसे उकळण्याचे काम केले. चेंबूरच्या नाक्यावर बसून कोंबडी कापता कापता स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले. त्या नारायण राणेंना अज्ञातवासात त्यांचा भूतकाळ आठवतो आहे. त्यामुळे कोंबड्या कशा कापल्या, लोकांना फसवले कसे हे आठवून त्यांची मुक्ताफळे सुरु असतात. त्याची दखल आम्ही घेत नाही. कोकणातील जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी वनवासात जावे आणि उर्वरित आयुष्य हरिनामाचा जप करत घालवावे,"

मी खात्रीपूर्वक सांगतो की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात आदर्श सरकार ठरेल. त्याचे अनुकरण देशातले लोक नक्की करतील आणि तशी सुरुवातही झाली आहे, असेही राऊत म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com