शिवसेना खासदार राऊत राष्ट्रवादीच्या भास्कररावांना म्हणाले, तुमच्यामुळे माझा विजय सोपा झाला

"माजी खासदार निलेश राणेंच्या विरोधात तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेली पेरणी कमालीची होती. तुमच्यामुळेच माझा विजय सोपा झाला,"अशी स्पष्ट कबुली खासदार राऊत यांनी आमदार जाधवांना दिली.
bhaskar-jadhav-raut
bhaskar-jadhav-raut

चिपळूण  : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली. या मैत्रीपूर्ण भेटीत मागील अनेक गोष्टींना उजाळा मिळाला.

"माजी खासदार निलेश राणेंच्या विरोधात तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेली पेरणी कमालीची होती. तुमच्यामुळेच माझा विजय सोपा झाला,"अशी स्पष्ट कबुली खासदार राऊत यांनी आमदार जाधवांना दिली.

 खासदार विनायक राऊत यांना  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांची  लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांच्या विरोधात मदत केल्याची चर्चा  होती त्यावर आज शिक्कामोर्तब झाले . या दोघांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडणार आहे . 

आमदार जाधव यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांच्या तब्येतीची  विचारपूस करण्यासाठी सर्वपक्षीय लोक त्यांच्याकडे येत आहेत. आमदार सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, युवा सेनेचे तालुकाधिकारी उमेश खताते यांच्यासह खासदार राऊत सकाळी 9 वाजता जाधवांच्या घरी गेले.

 तब्येतीची    विचारपूस  झाल्यानंतर देश, महाराष्ट्र आणि कोकणातील घडामोडींवर गप्पागोष्टी सुरू झाल्या. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजप किंवा स्वाभिमानच्या विरोधात कशी रणनिती तयार करावी लागेल याबाबत जाधवांनी आपले मत व्यक्त केले.

 त्यावर खासदार राऊत म्हणाले, "तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री असताना तेथे केलेली पेरणी कमालीची होती. प्रचाराच्या निमित्ताने मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात फिरत होतो तेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही केलेल्या बांधणीची मला माहिती दिली. तुमच्यामुळे माझा विजय सोपा झाला."

त्यानंतर आमदार जाधव म्हणाले," आगामी निवडणूकीत सुरेश प्रभू विरोधात असतील तर मेहनत घ्यावी लागेल. जर निलेश राणे विरोधात असतील तर तुम्ही घरात बसून निवडून याल. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तुमच्यावर प्रचंड विश्‍वास आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्यातरी प्रदेशाची जबाबदारी घ्या. कोकणात तुमची संघटना मजबूत आहे. तुमच्यावर प्रेम करणारे माझ्यासारखे कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीची चिंता नको," असे जाधवांनी राऊत यांना सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com