हक्काच्या मतांना धक्का  लागल्याने खासदार हेमंत गोडसे चिंतेत?

खासदार गोडसे नाशिक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. यामध्ये सहा पैकी दोन जागा शिवसेना तर तीन भाजपकडे होत्या. त्यामुळे प्रचारासाठी नेटवर्क भक्कम होते. यामध्ये देवळाली मतदारसंघ तीस वर्षे शिवसेनेकडे होता. योगेश घोलप आमदार होते. सिन्नरला राजाभाऊ वाजे होते. तर निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या आणदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत जाऊन उमेदवारी घेतली होती. या तिन्ही जागा मतदारंसघात तसेच पक्षाचे प्राबल्य असलेल्या होत्या. त्यामुळे गोडसेंसाठी प्रतिष्ठेच्या होत्या. मात्र, या तिघांचाही पारभव झाला.
Shivsena MP Hemant Godse
Shivsena MP Hemant Godse

नाशिक : लोकसभा निवडणुकीत दणदणीत मताधिक्‍य घेतल्याने शिवसेनेचे हेमंत गोडसे विजयी लाटांवर स्वार होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुक झाली. यामध्ये त्यांच्या मतदारसंघात अन्‌ त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्या मतांना गळती लागली. शिवसेनेची दीड लाख मते, घटली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची पावणे दोन लाख मते वाढली. तीन मतदारसंघ विरोधकांनी हिसकावून घेतल्याने खासदार हेमंत गोडसेंसाठी हा  धोक्‍याचा इशारा मानला जात आहे.

खासदार गोडसे नाशिक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. यामध्ये सहा पैकी दोन जागा शिवसेना तर तीन भाजपकडे होत्या. त्यामुळे प्रचारासाठी नेटवर्क भक्कम होते. यामध्ये देवळाली मतदारसंघ तीस वर्षे शिवसेनेकडे होता. योगेश घोलप आमदार होते. सिन्नरला राजाभाऊ वाजे होते. तर निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या आणदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत जाऊन उमेदवारी घेतली होती. या तिन्ही जागा मतदारंसघात तसेच पक्षाचे प्राबल्य असलेल्या होत्या. त्यामुळे गोडसेंसाठी प्रतिष्ठेच्या होत्या. मात्र, या तिघांचाही पारभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माणिकराव कोकाटे (सिन्नर), सरोज अहिरे (देवळाली), हिरामण खोसकर (कॉंग्रेस) विजयी झाले. उर्वरीत सीमा हिरे (नाशिक पश्‍चिम), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), राहुल ढिकले (नाशिक पूर्व) या जागा भाजपने राखल्या. मात्र, त्यातही मताधिक्‍य घटले.

लोकसभेला शिवसेनेचे खासदार गोडसे यांना पाच लाख 63 हजार 591 मते मिळाली. विधानसभेला त्यात 1.33 लाख मते घटली. राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते दोन लाख 71 हजार 385 वरुन चार लाख 54 हजार 790 एव्हढी झाल्याने त्यात 1.83 लाखांची वाढ झाली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने मते खेचुन आणली. त्यामुळे आगामी काळात आपल्या हक्काचे मतदार दुरावले हा त्यांना अप्रत्यक्ष राजकीय इशारा आहे. त्याने सध्या खासदार गोडसेंना अधिक परिश्रम करावे लागणार हा संदेश गेला आहे.

नाशिक हा गेले काही वर्षे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातातून निसटत चाललेला मतदारसंघ अशी स्थिती होती. 2009 मध्ये डॉ. शोभा बच्छाव यांचा विधानसभा तर 2014 मध्ये लोकसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा पराभव झाला. तेव्हापासून येथे युतीचेच लोकप्रतिनिधी निवडून आले. सहा महिन्यांआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी 2.91 लाख एव्हढे मताधिक्‍य मिळाले.

सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याने गेले सहा महिने ते याच लाटेवर स्वार होते. गोडसे विधानसभेच्या प्रचारात होते. विविध रॅली, दौरे, प्रचार फेऱ्यांत सहभागी झाले. मात्र, त्यांनी प्रचार केलेले देवळाली. सिन्नर आणि इगतपुरी या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाले. उर्वरीत मतदारसंघ भाजपकडे होते. तिथे भाजपने जागा राखल्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com