स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठीचे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर - सामनातून भाजपवर वार

आपल्या आजच्या अग्रलेखात सामना म्हणतो......105 वाल्यांनी आधीच राज्यपालांना भेटून सांगितले आहे की आमच्याकडे बहुमत नाही, आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत. राष्ट्रपती राजवट लागताच 'आता सरकार फक्त आमचेच बरं का ! हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? जे बहुमत त्यांच्यापाशी आधी नव्हते, ते राष्ट्रपती राजवातीच्या वरवंट्या खालून कसे बाहेर पडणार?लोकशाही आणि नैतिकतेचा खून करून आकडा लावू शकतो. ही भाषा महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही, मग बोलणाऱ्या तोंडाची डबडी कोणत्याही पक्षाची असोत.स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करण्याचे वाचन देणाऱ्याचा हा खोटारडेपणा आहे
Sanjay Raut Shivsena MP Criticises BJP Again Through Samana
Sanjay Raut Shivsena MP Criticises BJP Again Through Samana

मुंबई :  ''राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार जडले आहेत.  कोण कसे सरकार बनवतो तेच पहातो, अशी अप्रत्यक्ष भाषा आणि कृती सुरू झाली आहे.  सरकार बनवले तर कसे आणि किती दिवस टिकत ते पाहू असे शाप दिले जात आहेत.  महाराष्ट्राचे आपण मालक आणि देशाचे बाप आहोत या खुळ्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे. स्वतःच षंढत्व लपवण्यासाठी सुरू केलेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत,'' अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून भाजपवर वार करण्यात आला आहे.

आपल्या आजच्या अग्रलेखात सामना म्हणतो......105 वाल्यांनी  आधीच राज्यपालांना भेटून सांगितले आहे की आमच्याकडे बहुमत नाही, आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत.  राष्ट्रपती राजवट लागताच 'आता सरकार फक्त आमचेच बरं का ! हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? जे बहुमत त्यांच्यापाशी आधी नव्हते, ते राष्ट्रपती राजवातीच्या वरवंट्या खालून कसे बाहेर पडणार? लोकशाही आणि नैतिकतेचा खून करून आकडा लावू शकतो. ही भाषा महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही, मग बोलणाऱ्या तोंडाची डबडी कोणत्याही पक्षाची असोत. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करण्याचे वाचन देणाऱ्याचा हा खोटारडेपणा आहे आणि तो पुन्हापुन्हा उघड होत आहे. सत्तेचा किंवा मुख्यमंत्रीपदाचा कमरपट्टा घेऊन येथे कोणी जन्मास आलेले नाही. एक बाजूला फडणवीस 'राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार!'असा दावा करतात तर दुसरीकडे गडकरी यांनी क्रिकेटचे रबरी चेंडू राजकारणात टोलावले आहेत.......

.....क्रिकेट आणि राजकारण अंतिम काही नाही, कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल फिरू शकतो. एका क्षणी हातातून गेलेल्या सामन्यात विजय मिळू शकतो, असा सिद्धांत गडकरी मांडतात. गडकरी यांचा क्रिकेटशी संबंध नाही, त्यांचा संबंध सिमेंट, इथेनॉल, डांबर यांच्याशी आहे. संबंध असलाच तर शरद पवार आणि  क्रिकेटचा आहे. क्रिकेटच्या खेळात राजकारणाप्रमाणे फोडाफोडी आणि फिक्सिंगचा खेळ मैदानावर सुरू झालाय. त्यामुळे खेळ जिंकतो की फिक्सिंग जिंकते, हा संशय राहातोच. गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय खेळास क्रिकेटच्या रोमांचक खेळाची दिलेली उपाधी योग्य आहे. राजकारणात ज्यांच्याकडून निरपेक्ष निर्णयाची अपेक्षा असते ते पंच फूटल्यावर (किंवा फोडल्यावर) पराभवाच्या टोकाला गेलेल्यांच्या आशा पल्लवित होणारच...असेही सामनाने लिहिले आहे. 

आता आमचेच सरकार! त्यातून जागा झाला असेलही . पण मैदानात स्टंप नावाची दांडकी आहेत ती हातात घेऊन जनता तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही''पुन्हा आमचेच सरकार'' किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. महाराष्ट्रात वेड्यांच्या रुग्णांना भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला घातक आहेत. आम्ही त्या सगळ्यांना पुन्हा प्रेमाचा सल्ला देतो, इतकं मनास लावून घेऊ नका...असा सल्ला शिवसेनेने भाजपाला दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com