दुष्काळी मोर्चातून शिवसेनेचा गुरुवारी भाजप सरकार अन्‌ भुजबळांविरोधात एल्गार ! 

नांदगाव मतदारसंघ सातत्याने दुष्काळी संबोधला जातो. सध्या येथे सिंचन तर दूरच, पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी आणि विविध संस्थांनी वेळोवेळी मोर्चे काढून लक्ष वेधले आहे. भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या पार्श्‍वभूमीवर होणारा मोर्चा हा थेट राज्य सरकार विरोधातच आहे. त्यामुळे त्याला वेगळे राजकीय संदर्भ जोडले जात आहेत.
दुष्काळी मोर्चातून शिवसेनेचा गुरुवारी भाजप सरकार अन्‌ भुजबळांविरोधात एल्गार ! 

नांदगाव : दुष्काळात होरपळणाऱ्या नांदगावला येत्या गुरुवारी शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना, भाजप युतीत काडीमोड होण्याच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारविरोधात शक्तीप्रदर्शनाचा हा भाग आहे. त्यामुळे शिवसेनेने सरपंचांपासून ते लहान लहान पदाधिकाऱ्यांची यंत्रणाही त्यासाठी जुंपली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रभावक्षेत्रातील हे शक्तीप्रदर्शन किती यशस्वी होते याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. 

नांदगाव मतदारसंघ सातत्याने दुष्काळी संबोधला जातो. सध्या येथे सिंचन तर दूरच, पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी आणि विविध संस्थांनी वेळोवेळी मोर्चे काढून लक्ष वेधले आहे. भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या पार्श्‍वभूमीवर होणारा मोर्चा हा थेट राज्य सरकार विरोधातच आहे. त्यामुळे त्याला वेगळे राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. 

या संदर्भात न्यायडोंगरी येथील राममंदिरात बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सुहास कांदे, माजी सभापती विलासराव आहेर उपस्थित होते. दुष्काळाच्या प्रश्नावर एल्गार मोर्चा तहसीलदार कार्यालयावर जाईल. राजकीय वर्तुळात मोर्चाचे पडसाद उमटणार आहेत. सहभागी होणाऱ्यांच्या संख्येचा अंदाज सध्या पोलीस घेत आहेत. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून यासंदर्भात शिवसेनेकडून सूक्ष्म नियोजन केले जात आहे. 

आमदार पद वगळता उर्वरीत बहुतांश सत्ताकेंद्रे शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे गावनिहाय शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन या सगळ्यांना गर्दीचे उद्दीष्ट दिले आहे. त्यामुळे मोर्चा किती यशस्वी होतो, याला महत्व प्राप्त झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com