Shivsena in a Mood to Implement Plant B to Form the Government | Sarkarnama

...तर शिवसेना राबवणार आपला प्लॅन 'बी'

वैदेही काणेकर
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

भाजपकडून युतीचा संवाद बंद झाला असून पुढचे ४८ तास शिवसेना वाट पाहणार आहे. त्यामुळे  पुढचे ४८ तास युतीसाठी महत्वाचे आहेत. या काळात काही घडले नाही, किंवा भाजपकडून संवाद साधला गेला नाही तर शिवसेनेचा 'प्लॅन बी' हा 'प्लॅन ए' होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबई : भाजपकडून युतीचा संवाद बंद झाला असून पुढचे ४८ तास शिवसेना वाट पाहणार आहे. त्यामुळे  पुढचे ४८ तास युतीसाठी महत्वाचे आहेत. या काळात काही घडले नाही, किंवा भाजपकडून संवाद साधला गेला नाही तर शिवसेनेचा 'प्लॅन बी' हा 'प्लॅन ए' होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राज्यात निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर बारा दिवसांनंतरही सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. ही निवडणूक युती म्हणून लढलेल्या भाजप व शिवसेनेत जागा वाटपावरुन सुरु असलेला तिढा कायम आहे. त्यातच शिवसेना आघाडीसोबत जाऊन सरकार स्थापन करेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. 

हे देखिल वाचा - 'ते' देखिल शरद पवारांच्या संपर्कात - संजय राऊत

थोडक्यात सत्तेच्या चाव्या शिवसेनेसोबत आहेत. काहीही झाले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, अशी भूमीका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत सतत मांडत आहेत. याबाबत भाजप अद्याप काहीही बोलायला तयार नाही. हा पेच सुटावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीला जाऊन भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. तरीही भाजपकडून सरकार स्थापनेबाबत अद्याप काही ठोस समोर आलेले नाही. त्यामुळेच शिवसेना 'प्लॅन बी' राबवण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

काय आहे 'प्लॅन बी'?
अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत भाजप असल्याने आताही सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजपसोबत असेल हा पहिला पर्याय अर्थात 'प्लॅन ए' शिवसेनेसमोर आहे. मात्र तसे न घडल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्ता स्थापन करणार आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार शिवसेनेचा 'प्लॅन बी' असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख