shivsena mlas oppose aditi tatkare as guardian minister of raigad | Sarkarnama

अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास सेनेच्या आमदारांच्या विरोध

विकास मिरगणे
बुधवार, 1 जानेवारी 2020

रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस असा संघर्ष राहिलेला आहे. त्यामुळे येथे पालकमंत्री म्हणून कोण येणार, याची उत्सुकता आहे. 

नवी मुंबई : रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष नेहमीच राहिला आहे. महाविकास आघाडीमध्ये रायगड मधून आदिती तटकरे यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातून शिवसेनेचे तीन आमदार असून एकालाही या वेळी मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे शिवसेनेमध्ये काही प्रमाणामध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे

रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे यांना संधी न देता  मुंबईतून शिवसेनेचा पालकमंत्री करा, अशी भूमिका सेनेच्या आमदारांनी घेतली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची सेनेच्या आमदारांनी सांगितले आहे. शेकापनेही अशीच भूमिका घेतली आहे.

आघाडी सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री तत्कालीन  सुनील तटकरे असताना त्यांनी काॅंग्रेस, शेकाप आणि शिवसेना यांना रायगडच्या राजकारणात वरचढ होण्याची संधी दिली नाही. त्यामुळे तटकरेंनी रायगडमध्ये कोणत्याही पक्षाला किंवा रायगड जिल्ह्यातील नेत्यांला  वरचढ होऊ दिले नाही. आदिती पालकमंत्री झाल्या तर पुन्हा तसेच होऊ शकते, असा धोका सेना आमदारांना वाटत आहे.

फडणवीस सरकारमध्ये पालकमंत्रिपदी रवींद्र चव्हाण असताना त्यांनीसुद्धा रायगडमध्ये सेना वाढू नये, अशी भूमिका घेतली होती .त्यामुळे आता तरी अन्याय नको त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री हे शिवसेनेकडेच असावे, असा स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख