'मातोश्री'वर आमदारांना मोबाईल बंदी!

भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेचे आमदार फोडण्याची भीती शिवसेनेच्या मनात आहे. त्यामुळे आजच्या शिवसेनेच्या बैठकीत काय चर्चा होते याची माहिती भाजपला मिळू नये म्हणून बैठकीसाठी आलेल्या आमदारांना मोबाईल बाळगण्यास बंदी करण्यात आली आहे.
No Mobiles in Matoshree for Shivsena Meeting
No Mobiles in Matoshree for Shivsena Meeting

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेचे आमदार फोडण्याची भीती शिवसेनेच्या मनात आहे. त्यामुळे आजच्या शिवसेनेच्या बैठकीत काय चर्चा होते याची माहिती भाजपला मिळू नये म्हणून बैठकीसाठी आलेल्या आमदारांना मोबाईल बाळगण्यास बंदी करण्यात आली आहे. 

राज्यात सुरु असलेल्या संघर्षात आमदारांची फोडाफोडी होऊ नये यासाठी राजकीय पक्ष काळजी घेत आहेत. भाजपमधले निवडणुकीच्या आधी झालेले 'इनकमिंग' पाहता या पक्षाकडून शिवसेनेच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होईल, अशी भीती शिवसेना नेत्यांना वाटते आहे. त्यातच भाजप आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बैठकीत काय घडते हे बाहेर जाऊ नये, यासाठी 'मातोश्री' कडून ही काळजी घेण्यात आली आहे. या आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनाही बैठकीच्या स्थानापासून दूर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या एकाही आमदाराच्या जवळ जाण्याची कुणाची हिंमत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सकाळीच सांगितले आहे. तर आम्ही कुणाचेही आमदार  फोडण्याचा प्रयत्न करत नाही, शिवसेनेचे आमदारही निष्ठावान असून तेही फुटणार नाहीत, असे सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com