पालिका निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेना आमदारांची ही युक्ती

....
shivsena mlas to adopt taluka as a strategy says gulabrao patil
shivsena mlas to adopt taluka as a strategy says gulabrao patil

जळगाव : जिल्ह्यातील तालुक्‍याचा विकास करण्यासाठी शिवसेनेचे आमदार जिल्ह्यातील तालुके दत्तक घेणार आहेत, तसेच जिल्ह्यातील अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची लवकरच आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी (ता. 11) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांची बैठक शनिवारी (ता. 11) अजिंठा विश्रामगृहात झाली. यावेळी आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील शिवसेना तालुकाप्रमुखांची बैठक घेण्यात आली. तीत तालुक्‍यातील विकासासाठी त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. त्या- त्या तालुक्‍यातील अपूर्ण प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही लवकरच घेण्यात येईल. त्या- त्या प्रकल्पाबाबत काय अडचणी आहेत, याबाबतची माहितीही त्यांच्याकडून घेण्यात येईल.

तालुके दत्तक घेणार
आगामी सोळा- सतरा महिन्यांत जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने पक्षातर्फे नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील तालुक्‍यांचा विकास करण्यासाठी प्रत्येक शिवसेनेच्या आमदारांनी एक- दोन तालुके दत्तक घ्यावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने शिवसेना आमदार आता तालुके दत्तक घेऊन विकास करतील.

"जलयुक्त'वरील स्थगिती उठविणार
जिल्ह्यातील "जलयुक्त शिवार'चा निधी रोखण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली होती. त्याबाबत मंत्री पाटील म्हणाले, की त्यांनी कोणताही निधी रोखलेला नाही, त्याला केवळ स्थगिती दिली आहे आणि ही स्थगितीही ते लवकरच उठवतील. पाणीपुरवठ्याच्या विविध 800 कोटींच्या योजनेवरील स्थगितीही त्यांनी नुकतीच उठविली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा ही जीवनावश्‍यक गरज आहे. त्यासंदर्भातही कोणतीही योजना रोखली जाणार नाही.

खडसेंच्या कायम संपर्कात
एकनाथराव खडसेंशी संपर्काविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की एकनाथराव खडसे यांच्याशी माझा कायमच संपर्क असतो, आताही आहेच आणि तो केवळ पक्षप्रवेशासंदर्भातच असतो असे नाही, इतर विषयांवरही असतोच.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com