आमदार राजाभाऊ वाजेंनी 'स्पीकर ऑन' करताच ग्रामसेवक थरथर कापू लागला! 

आमदार वाजे हे शिवसेनेचे आहेत. मात्र, त्यांचे काम राजकारणविरहीत आहे. त्यामुळे अगदी सामान्य ग्रामस्थांशीही ते आपुलकीने बोलतात. कोणाशीही त्यांचा सहज संवाद असतो. कहांडळवाडी गावात त्यांचे विरोधक माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाची सत्ता आहे. त्यामुळे विरोधकांची सत्ता असल्याने येथे टॅंकर मंजूर होत नाही अशी चर्चा पसरली होती. ग्रामसेवक सातत्याने टॅंकरचा प्रस्ताव पाठवला असे सांगत होता. त्यामुळे आमदार वाजे गावात गेल्यावर त्यांना ग्रामस्थांनी गराडा घालत कोंडाळे केले.
आमदार राजाभाऊ वाजेंनी 'स्पीकर ऑन' करताच ग्रामसेवक थरथर कापू लागला! 

सिन्नर : सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे मतदारसंघातील कहांडळवाडी येथे गेले होते. तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना गराडा घालत दोन महिन्यांपासून पाणी नाही असा जाब विचारला. ग्रामसेवकांनी दोन महिन्यांपूर्वीच प्रस्ताव पाठवल्याचे सांगीतले. आमदारांनी संबंधीत अधिकाऱ्यांना फोन लावला. ग्रामस्थांच्या गराड्यात 'स्पीकर ऑन' करुन विचारणा केली. तेव्हा असा प्रस्तावच नसल्याचे संबंधितांनी सांगितल्यावर मात्र ग्रामसेवक अन्‌ विरोधी गटाचे राजकारण उघडे पडल्याने तो थरथर कापू लागला. 

आमदार वाजे हे शिवसेनेचे आहेत. मात्र, त्यांचे काम राजकारणविरहीत आहे. त्यामुळे अगदी सामान्य ग्रामस्थांशीही ते आपुलकीने बोलतात. कोणाशीही त्यांचा सहज संवाद असतो. कहांडळवाडी गावात त्यांचे विरोधक माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाची सत्ता आहे. त्यामुळे विरोधकांची सत्ता असल्याने येथे टॅंकर मंजूर होत नाही अशी चर्चा पसरली होती. ग्रामसेवक सातत्याने टॅंकरचा प्रस्ताव पाठवला असे सांगत होता. त्यामुळे आमदार वाजे गावात गेल्यावर त्यांना ग्रामस्थांनी गराडा घालत कोंडाळे केले. 

आमदारांनी थेट टॅंकर मंजूर करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्यालाच फोन लावला. स्पीकर ऑन केला. अन्‌ ग्रामपंचायतने प्रास्तवच पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्याचे उत्तर ग्रामस्थांनी ऐकल्यावर ग्रामसेवकाचा बनाव उघड झाल्याने आमदारांसमोर तो थरथर कापू लागला. तर ग्रामपंचायत सदस्य खाली मान घालत पांगले. मोबाईलच्या स्पीकरने पाण्यावर रंगलेले दोन महिन्याचे राजकीय नाट्य क्षणात संपुष्टात आणले. त्याची चर्चा जिल्हाभर पसरली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com