शिवसेना आमदारांचे हॉटेलात रंगले फोटोसेशन...

 शिवसेना आमदारांचे हॉटेलात रंगले फोटोसेशन...

औरंगाबादः सत्ता स्थापनेचा पेच सुटता सुटत नाहीये, त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारत थेट भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिध्द करण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या सगळ्या आमदारांना मुंबईच्या वेगवेगळ्या हॉटेलात थांबवण्यात आले आहे. 

दगाफटका आणि आमदार फुटू नयेत याची काळजी तीन्ही पक्षांचे प्रमुख नेते वाहतांना दिसत आहेत. नवनिर्वाचित आमदारांना आपल्या पक्षाच्या नेत्यासोंबत एवढा वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने आमदार भलतेच खुष आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे हे वारंवार आमदारांच्या भेटीला येत असल्याने त्यांच्यासोबत फोटो काढण्यात आमदार दंग असल्याचे चित्र पहायला मिळाले. 

भाजपकडून महाविकास आघाडीचे आमदार फोडण्याचे प्रयत्न होणार ही शक्‍यता लक्षात घेऊन आघाडीच्या नेत्यांनी आपापले आमदार सुरक्षित स्थळी हलवले आहेत. शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम ललित हॉटेलमध्ये तर राष्ट्रवादीचे आमदार मुंबईच्याच रेनीसन्स हॉटेलात कडक बंदोबस्तात नेत्यांच्या देखरेखीखाली वास्तव्यास आहेत. कॉग्रेसने देखील त्यांच्या आमदारांना मुंबईतच थांबवले आहे. 

भाजपच्या राजकीय भूकंपानंतर चिलबिचल झालेल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान आघाडीच्या नेत्यांसमोर आहे. तसेच सरकार आपलेच येणार हा विश्‍वास देखील हे नेते एकमेकांच्या आमदारांना देत आहेत. शरद पवार शिवसेना-कॉंग्रेसच्या आमदारांना तर उध्दव ठाकरे राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या आमदारांना भेटायला जात आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते देखील आपल्या पक्षाच्या आमदारांना दिलासा देतांना दिसत आहेत. 

या घडामोडीमुळे नेत्यांच्या वांरवार भेटी होत असल्याने नव्यानेच निवडूण आलेल्या आमदारांनी आपल्या नेत्यांसोबत फोटोसेशन करण्याची संधी साधली. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर यांनी उध्दव ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यासोबत तर शिवसेनेचे उदयसिंग राजपूत, प्रा. रमेश बोरणारे यांनी हॉटेल ललित येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोटोसेशन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com