Shivsena ministers Bhumre , sattar , shambhraj , bhuse, gadakh, Bacchu kadu , Rathod | Sarkarnama

शिवसेनेतर्फे  भुमरे, सत्तार, राठोड, शंभूराजे, भुसे, गडाख, बच्चू कडू यांना मंत्रीपद 

मृणालिनी नानिवडेकर 
सोमवार, 30 डिसेंबर 2019

शिवसेना दर दोन वर्षांनी सेना मंत्री बदलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले . बृहन्न मुंबई बाहेर  १० जणांना संधी देताना ग्रामीण भागाला प्राधान्य   देण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला आहे. 

मुंबई : शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मुंबई बाहेरील नेत्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे . 

शिवसेनेतर्फे सातत्याने निवडून येणाऱ्या  आमदारांना संधी देण्यात येत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठण मतदारसंघातून सांदिपान भुमरे हे  पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत .  ते विहामांडवा येथील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत . 

अनिल परब हे विधान परिषदेचे सदस्य आहेत . ते विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते होते. उद्धव ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात . 

गुलाबराव पाटिल  जळगाव ग्रामीण मधून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . ते माजी मंत्री आहेत . 

संजय राठोड, दिग्रस- यवतमाळ जिल्हा  येथून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . ते माजी राज्य मंत्री आहेत . 

उदय सामंत  रत्नागिरी मधून २००४ पासून सलग  चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . 

दादा भुसे यांचीही आमदारकीची ही चौथी टर्म आहे . ते मलेगाव बाह्य मतदारसंघातून निवडून आलेले आहेत . ते माजी राज्यमंत्री आहेत . 

शंभुराज देसाई  हे सातारा जिल्ह्यातील पाटण मधून सलग चौथ्यांदा आमदार म्ह्णून निवडून आलेले आहेत .  

भाजपमध्ये निघालेले पण ऐनवेळी तिकिटासाठी शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तार (सिल्लोड, औरंगाबाद जिल्हा ) यांना मंत्री पदाची लॉटरी लागली असून ते सिल्लोड मधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत . सत्तार यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे दोनदा आमदार म्हणून निवडून आलेलं आहे आणि ते राज्यमंत्रीही राहिलेले आहेत .  शिवसेनेचा मुस्लिम चेहरा  म्हणून त्यांचा राज्यात प्रभाव वाढणार आहे . 

दोन सहयोगी आमदारांना मंत्रीपद देण्याचा  निर्णय शिवसेनेने घेतला आहे .   

क्रांतिकारी शेतकरी  पक्षाचे शंकरराव गडाख (नेवासा, नगर जिल्हा  ) आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू  हे सलग चौथव्यांदा अचलपूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत   

मुंबईतून स्वत: उद्धव ठाकरे , एकनाथ शिंदे आणि   सुभाष देसाई असल्याने आता अनिल परब सोडून अन्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी  आहे. 

शिवसेना दर दोन वर्षांनी सेना मंत्री बदलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले . बृहन्न मुंबई बाहेर  १० जणांना संधी देताना ग्रामीण भागाला प्राधान्य   देण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख