देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार असल्याची शिवसेनेच्या राठोड यांना खात्री कशी ? 

संजय राठोड मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी म्हणून गेल्या पाच वर्षांपासून असल्याने दोघात सौहार्दपूर्ण संबंध असले तरी फडणवीसांचे उद्धव ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत .
0sanjay_rathod_dingras_
0sanjay_rathod_dingras_

नागपूर  : आगामी मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा, यावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून दावा करण्याची एकही संधी सोडली जात नाही. अशातच महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे मत जाहीरपणे व्यक्त केले. 

 संजय राठोड मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी म्हणून गेल्या पाच वर्षांपासून असल्याने दोघात सौहार्दपूर्ण  संबंध असले तरी फडणवीसांचे उद्धव  ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत .

त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा झडू लागल्या असून विविध प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. कॅबिनेट मंत्रीपदाची आशा बाळगून असलेल्या राठोड यांनी दारव्ह्याच्या स्टेटमेंटमधून सेनेच्या शिर्षस्थ नेत्यांवर दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे का ? याबाबत  राजकीय विश्‍लेषकांत चर्चा आहे . 

यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील शीतयुद्ध लोकसभा निवडणुकीनंतर 'शीतयुद्ध' राहीलेलेच नाही. भावना गवळी लोकसभेला संजय राठोड यांनी केलेल्या 'मदती'ची परतफेड करण्यासाठी आतुर   असल्याचे बोलले जाते . भावना गवळी यांचे उद्धव ठाकरे आणि आदित्य  ठाकरे यांच्याकडे चांगले वजन आहे . तर राठोड यांना विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद न दिल्यामुळे ते नाराज आहेत. 

त्यातही गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांना तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मनोहररावांचे चिरंजीव इंद्रनिल यांनी शिवसेना प्रवेशाची घोषणाही केली होती. त्यामुळे सेनेत आपले खच्चीकरण केले जात असल्याची राठोड यांची भावना झाली असण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या आजपर्यंतच्या यात्रेत एकाही शिवसेना नेत्याने जाहीर सभा घेतली नाही आणि राठोड यांनी हिरीरीने पुढाकार घेऊन जाहीर सभा आयोजित केली.एवढेच नव्हे तर "देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील', असे वक्तव्यही व्यासपीठावरुन केले. यावेळी विविध विकास कामांसाठी भरपूर निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांची मुक्तकंठाने प्रशंसाही त्यांनी केली.

या कृतीतून त्यांनी  पक्ष श्रेष्ठींना काय इशारा दिला याबाबत चर्चा  आहे . तर मुख्यमंत्र्यांशी सलगी साधून राठोड भाजप प्रवेशाची तर तयारी करत नसावे, असे एक ना अनेक प्रश्‍न राठोड यांच्या दारव्हा येथील सभेनंतर उपस्थित केले जात आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी "सरकारनामा'ने संजय राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com