गुलाबराव पाटील; पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री

गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते आहेत. आक्रमक वक्तृत्व हे त्यांचे वैशिष्ठ आहे. अत्यंत सर्वसाधारण घरातून ते आले आहे. पाळधी (ता.जळगाव)येथे पानटपरी चालवित असत. शिवसेना प्रमुख (कै.)बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे ते शिवसेनेत आले.
Shivsena Leader Gulabrao Patil Takes Oath
Shivsena Leader Gulabrao Patil Takes Oath

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार झाला आहे. जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेतर्फे उपनेते गुलाबराव पाटील यांचे कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली आहे.कट्टर शिवसैनिकाला पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रीपदाची संधी दिली आहे. एक साधा पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते आहेत. आक्रमक वक्तृत्व हे त्यांचे वैशिष्ठ आहे. अत्यंत सर्वसाधारण घरातून ते आले आहे. पाळधी (ता.जळगाव)येथे पानटपरी चालवित असत. शिवसेना प्रमुख (कै.)बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे ते शिवसेनेत आले. शिवसैनिक म्हणून त्यांनी विविध आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्या आक्रमक शैलीतील वक्तृत्वामुळे जनतेत लोकप्रिय झाले. सन 1992 मध्ये ते एरंडोल पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले. 

सन 1995ते 1999 या कालावधीत शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. 1997मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य झाले. 1999 मध्ये एरंडोल विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर पुन्हा 2004 मध्ये त्यांनी याच मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. 2014 म्हणून ते तिसऱ्यांदा जळगाव ग्रामीण मतदार संघातून विजयी झाले. 

त्यानंतर युतीच्या मंत्रीमंडळात त्यांना सहकार राज्यमंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली. आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात त्यांना राज्याचा मंत्री होण्याची दुसऱ्यांदा संधी मिळत आहे. यावेळी त्यांना बढती मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com