...तर राज ठाकरे संगीतकार झाले असते : गुलाबराव पाटील

नाशिक येथील महापालिका पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा झाली
Gulabrao Patil Publice Meeting in Nashik
Gulabrao Patil Publice Meeting in Nashik

नाशिक  : मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या मागे ठाकरे हे आडनाव नसते तर कदाचित ते राजकारणाऐवजी संगीत क्षेत्रात दिसले असते, अशी बोचरी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

येथील महापालिका पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टिका केली. ते म्हणाले, ''राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जनतेसाठी काय करायचे हेच त्यांचे निश्‍चित नाही. त्यांचे कार्यकर्ते गोंधळळेले आहेत. राज यांच्या नावामागे ठाकरे हे आडनाव आहे म्हणून त्यांना महत्व आहे. ठाकरे आडनाव नसते तर ते संगीत क्षेत्रात गेले असते.''

तुम्ही निवडून दिलेला शिवसेनेचा लोकप्रतिनिधी कामे करीत नसेल तर त्याच्या दारी मी स्वत:  पाटील मोर्चा काढेन, असे आश्‍वासनही  पाटील यांनी दिले. शिवसेना हा नुसताच पक्ष नसून एक विचार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणारे आम्ही लोक आहोत. गद्दारी आमच्या रक्‍तात नाही. गद्दारी केल्यावर शिवसेना कसा धडा शिकवते हे महाराष्ट्राने पाहिले आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपचे नाव न घेता केली.

भाजपवर टीका करताना ते म्हणाले, ''भाजपकडे प्रचंड पैसा आहे. निवडून झाल्यावर पैसा खायचा व निवडणुका लागल्यावर पैसा वाटायचा हा एकमेव धंदा भाजपवाल्यांचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असल्याने महाराष्ट्राचा विकास निश्‍चित आहे. भाजपच्या काळात घोषणा अधिक व कामे कमी झाले. नोटाबंदीमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नोटाबंदीमुळे महिलांना स्वयंपाकघराच्या डब्यात ठेवलेला आपला बचतीचा पैसाही बाहेर काढावा लागला.''

या वेळी महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते विलास शिंदे, माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेविका सुवर्णा मटाले, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, कल्पना पांडे, कल्पना चुंबळे, हर्षदा गायकर, महानगरप्रमुख विलास शिंदे, संतोष गायकवाड, कॉंग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com