राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रचारात पत्नी, बहिणीचीच आघाडी

राज्यमंत्री दादा भुसे शिवसेनेचे नेते असल्याने जिल्ह्यातील महायुतीच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांना सहभागी व्हावे लागते. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जावे लागते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रचाराचा ताण हलका करण्यासाठी पत्नी अनिता भुसे, बहिण कासूबाई, मुले अजिंक्‍य, अविष्कार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. हे सर्वजण बैठका, घरोघरी प्रचार आणि परिचितांशी थेट संपर्क साधून मतदानाचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे एक प्रकारे भुसे यांचे सबंध कुटुंबच प्रचारात रंगले आहे.
Shivsena Minister Dada Bhuse Family in Assemly Election at Malegaon
Shivsena Minister Dada Bhuse Family in Assemly Election at Malegaon

मालेगाव : राज्यमंत्री दादा भुसे शिवसेनेचे नेते असल्याने जिल्ह्यातील महायुतीच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांना सहभागी व्हावे लागते. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जावे लागते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रचाराचा ताण हलका करण्यासाठी पत्नी अनिता भुसे, बहिण कासूबाई, मुले अजिंक्‍य, अविष्कार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. हे सर्वजण बैठका, घरोघरी प्रचार आणि परिचितांशी थेट संपर्क साधून मतदानाचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे एक प्रकारे भुसे यांचे सबंध कुटुंबच प्रचारात रंगले आहे.

प्रचारासाठी कितीही मनुष्यबळ असले तरी ते कमी पडते. मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क असूनही शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यावर पक्षाच्या अन्य उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी आहे. त्यामुळे मालेगाव बाह्य मतदारसंघात हॅटट्रीक केलेले भुसे यंदा चौथ्यांदा मतदारांचा कौल घेत आहेत. त्यामुळे भुसेंच्या अनुपस्थितीत बहीण कासूबाई, पत्नी अनिता, मुलगे अजिंक्‍य, आविष्कार यांनी आपल्या आपत्स्वकीयांची एकजुट करीत प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहे. बहुतांश नातेवाईक त्यांच्या प्रचारात आहेत.

उमेदवार भुसे व लहान मुलगा आविष्कार हा युवासेनेचा संघटक आहे. उर्वरित कुटुंबीय व नातेवाईक थेट राजकारणात सहभागी नाहीत. मात्र निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग असतात. कुटुंबासह प्रत्येक सदस्याने एकेक आघाडी सांभाळली आहे. पत्नी अनिता यांच्यासह भगिनी कासूबाई देवरे या शिवसेना महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. 

मोठा मुलगा अजिंक्‍य नियोजनाकडे लक्ष ठेवून आहे. आविष्कार युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची फौज घेऊन प्रचार फेरीत गुंतला आहे. भाऊ दत्तू भुसे, पुतणे प्रशांत व तुषार, सून स्नेहल यांच्याबरोबरच भुसे यांचे शालक सोयगावचे माजी सरपंच जयराज बच्छाव व प्रवीण बच्छाव हे प्रचारात सक्रिय आहेत. शहरातील प्रचारफेऱ्या व चौकसभांची जबाबदारी प्रामुख्याने श्रीमती भुसे, मुलगा आविष्कार यांनी स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने स्वीकारली आहे.

श्रीमती भुसे यांनी महिला आघाडीचे विविध ठिकाणी मेळावे घेतले. सकाळी आठला घराबाहेर पडलेल्या महिला रात्री आठलाच प्रचार करून माघारी परततात. श्रीमती भुसे या टोपणनावाने परिचित आहेत. शहर व परिसरातील महिलांचा मोठा गोतावळा त्यांच्याशी संबंधित आहे. याशिवाय व्याही व अन्य नातेवाईकही प्रचारात उतरले आहेत. प्रचाराच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संबंधितांनी स्वीकारत श्री. भुसे यांना विजयी करण्याचे आवाहन घरोघरी प्रचारपत्रक वाटप करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com