तुमचे राणे..तर आमचे भुजबळ!

नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष 1 सप्टेंबर रोजी भाजपत विलीन करण्याची कोणतीही योजना निश्‍चित झालेली नाही. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत ठेवत त्यांच्या शक्‍तीनुसार त्यांना जागा देण्यास भाजपचे प्राधान्य आहे. त्यामुळे शिवसेनेला अस्वस्थ करणारे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
Narayan Rane - Chagan Bhujabal
Narayan Rane - Chagan Bhujabal

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप हे दोघेच महत्त्वाचे पक्ष ठरणार आहेत. राणे यांना भाजपने प्रवेश दिला, तर शिवसेनेतही शह देण्यासाठी छगन भुजबळ यांना आत घेण्याच्या हालचाली सुरू होतील. भुजबळ यांचे निकटवर्तीय प्रवेशासाठी 'मातोश्री'कडे डोळे लावून बसले आहेत.

भाजप सत्तेत असताना थेट तुरुंगवासात गेलेल्या या नेत्याचे स्थान युतीत नसावे, असा भाजपचा आग्रह आहे. नाशिक जिल्ह्यातील बबनराव घोलप यांनी भुजबळांच्या प्रवेशाला विरोधही केला आहे; मात्र राणेंना लाल गालिचा घालण्याची आगळीक भाजपने केल्यास सेनेतही भुजबळांची घरवापसी होईल, असे सांगितले जाते. राजकारणात कायम चर्चेचा विषय असलेल्या या बड्या नेत्यांनी या सर्व चर्चांबाबत कानावर हात ठेवणे पसंत केले आहे.

नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष 1 सप्टेंबर रोजी भाजपत विलीन करण्याची कोणतीही योजना निश्‍चित झालेली नाही. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत ठेवत त्यांच्या शक्‍तीनुसार त्यांना जागा देण्यास भाजपचे प्राधान्य आहे. त्यामुळे शिवसेनेला अस्वस्थ करणारे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. 

राणे यांच्याही मनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही शंका आहेत, असे राणेंच्या गोटातून सांगण्यात येते. फडणवीस यांनी नीतेश राणे आणि नारायण राणे यांच्याशी संवाद सुरू ठेवला आहे; मात्र नारायण राणे यांच्या पक्ष विलिनीकरणापेक्षा शिवसेनेला सोबत घेणे सध्या भाजपला महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे राणे यांना घ्यायचे आहे; मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांभाळूनच, असा भाजपचा निर्णय आहे. 

सहकारी पक्षाला समवेत घेण्याला भाजपने नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे राणेंच्या एका समर्थकाचे मत आहे. राणे आले, तर सेना कितपत नाराज होईल की तो भाजपचा अधिकार आहे, असे समजून सोडून देईल, त्याबद्दल शंका आहेत. त्यातच नीतेश राणे, नीलेश राणे यांचे मतदारसंघ शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आहेत, ते युतीत कुणाला सोडायचे, असा प्रश्‍न तयार होऊ शकेल, असे सांगण्यात येते.

हे देखिल वाचा -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com