दोन जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे नारळ देणार...

शिवसेनेत संघटनात्मक बदलाच्या हालचाली...
uddhav thackray may change in organisation
uddhav thackray may change in organisation

अमरावती ः भाजप पाठोपाठ आता सत्ताधारी शिवसेनेतही संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत आहेत. नागपूर येथे प्रारंभ झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येथील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हे संकेत मिळाल्याचे म्हटले आहे. चारपैकी दोन जिल्हाप्रमुख बाद केल्या जाणार असल्याचे समजते.

सत्तारूढ झाल्यानंतर शिवसेनेने राज्यभरात पक्षाच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातून सर्वच ठिकाणी संघटनात्मक बदल अपेक्षित करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात सेनेला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला त्या जिल्ह्यात बदल होणार असल्याचे संकेत आहेत. अमरावती लोकसभा व जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीत सेनेला पराभव पत्करावा लागला आहे. सलग दोनवेळा लोकसभा जिंकल्यानंतर या वेळी सेनेला दारुण पराभव स्वीकारावा लागला. तर विधानसभा निवडणुकीत चारपैकी एकही जागा जिंकता आलेली नाही.

पक्षाचा झालेला पराभव पक्षनेत्यांनी गांभीर्याने घेतला आहे. पराभवाची कारणमीमांसा करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून झाली आहे. त्याची दखल घेत वरच्या फळीतील नेत्यांनी संघटनात्मक बदल करण्याचे पक्षश्रेष्ठींनी सुचविले आहे. अमरावती जिल्ह्यात चार जिल्हाप्रमुख आहेत. त्यामुळे शिवसैनिकांना आपला नेता कोण? हे कळेनासे झाल्याने व ऐकावे तर कुणाचे? हा प्रश्‍न असल्याने दोन पद कमी करण्याचाही प्रस्ताव आहे. याशिवाय उपजिल्हाप्रमुख, महानगर, शहर, उपप्रमुख अशा संघटनेतील महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांमधेही बदल करण्यात येणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता आली असली तरी सैनिकांमधील चैतन्य मात्र हरविले आहे, असे चित्र जिल्ह्यात आहे. त्यातून नागपूरला सोमवारी (ता.16) काही पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीत व दरम्यान झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत बदल करण्यात येतील, असे संकेत मिळाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com