नाशिकमध्ये गिरीश महाजनांना दणका देण्याचे शिवसेनेचे मनसुबे

राज्यातील बदलत्या सत्ती समीकरणांचा पहिला प्रयोग नाशिकमध्ये होणार आहे. गेली पाच वर्षे भाजपची सत्ता गाजविणाऱ्या गिरीश महाजन यांची या वेळी कसोटी लागणार आहे...
नाशिकमध्ये गिरीश महाजनांना दणका देण्याचे शिवसेनेचे मनसुबे

नाशिक : भाजप पाठोपाठ शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मुंबईला रवाना झाले. "नाशिक महापालिकेपासून महाशिव आघाडीच्या विजयाची सुरवात होईल. ती राज्यभर जाईल. प्रतिस्पर्धी गटाचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. ही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत यंदा शिवसेनेचा महापौर झालेला दिसेल' असा दावा शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केला आहे.

पुढील आठवड्यात होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणुक होत आहे. यामध्ये सर्वच भाजप विरोधकांचे ध्रुवीकरण सुरु झाले आहे. त्यासाठी आज दिवसभर बैठका, वाटाघाटींचे सत्र सुरु होते. शुक्रवारी रात्रीपासून आज दिवसभर शिवसेना, कॉंग्रेस, मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये समन्वय साधण्यात आला. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी हे सर्व एकत्र येत आहेत. त्याला किती यश येईल हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र या आघाडीची सत्ता समीकरणे उदयाला आली तरी भाजपचे संख्याबळ वरचढ आहे. त्याला शेज लागली तरच शिवसेनेचे स्वप्न साकार होईल. त्यादृष्टीने शिवसेनेचे सर्व नगरसेवक एकत्र आहेत.

आम्हाला कोण फोडणार? आजवर शिवसेनेचा एकही नगरसेवक फुटलेला नाही हा इतिहास आहे. याउलट अन्य नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यांचा आकडा खुप मोठा आहे. मात्र आम्ही ती संख्या सांगणार नाही. येत्या दोन चार दिवसात चित्र स्पष्ट होईल असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे.

माजी आमदार बाळासाहेब सानप शिवसेनेत दाखल झाल्याने त्यांना भाजप मधील समर्थक नगरसेवकांची देखील साथ असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे दहा नगरसेवक सोबत असल्याने त्या आधारे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची महाआघाडी स्थापन झाल्याने महापालिकेत देखील महाशिवआघाडीचा पॅटर्न राबविण्याचा भाग म्हणून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ मिळाल्याने शिवसेनेने सत्ता काबिज करण्यासाठी आघाडी घेतल्याचा दावा संबंधीत नेत्यांनी केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com