महेंद्र दळवी यांना शेकापच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा फडकावला  

अलिबाग विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते.2014 च्या निवडणुकीत शेकापचे पंडित पाटील यांना 76 हजार 531 तर शिवसेनेचे महेंद्र दळवी यांना 60 हजार 652 मते मिळाली होती. त्यात 15 हजार 879 मतांनी पंडीत पाटील निवडून आले होते.आलेले अपयश बाजूला सारून शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी पाच वर्ष अलिबाग विधानसभा मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागातील घराघरात विश्वास संपादन केला.
Mahendra Dalvi - Pandit Patil
Mahendra Dalvi - Pandit Patil

अलिबाग : विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्हयात सात पैकी सहा जागा महायुतीने जिंकल्या. त्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. या निवडणुकीत शिवेसेनेचे 3 उमेदवार आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत दोन आमदार निवडून आले होते. यावेळी अलिबाग व कर्जतची जागी शिवसेनेला जिंकण्यास यश आले आहे. मात्र उरणमध्ये त्यांना बंडखोरीचा फटका बसला आहे. या पाच वर्षात शिवसेनेने घराघरात पोहचून विश्वास संपादन केला. जिल्हयात शिवसेनेला पोषक वातावरण निर्माण झाल्याने या निवडणुकीत शिवसेनच्या मतदानाचा टक्का वाढला असल्याचे दिसून आले आहे.

अलिबाग विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. शेकापचा बालेकिल्ला म्हणून अलिबाग विधानसभा मतदार संघाला ओळखले जात होते. या ठिकाणी शिवसेनेचे कधीच अस्तीत्व नव्हते. 2014 च्या निवडणुकीत शेकापचे पंडित पाटील यांना 76 हजार 531 तर शिवसेनेचे महेंद्र दळवी यांना 60 हजार 652 मते मिळाली होती. त्यात 15 हजार 879 मतांनी पंडीत पाटील निवडून आले होते.आलेले अपयश बाजूला सारून शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी पाच वर्ष अलिबाग विधानसभा मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागातील घराघरात विश्वास संपादन केला. 

मुरुड नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. महेंद्र दळवी यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा भगवा मुरुड नगरपालिकेवर फडकविण्यास यश आले. जिल्हा परिषदेचे तीन सदस्य निवडून देण्याचा प्रयत्न केला. महेंद्र दळवी यांना मतदार संघातील मतदारांवर एक वेगळी छाप टाकण्यात यश आले. त्यात अलिबाग - रोहा - मुरुड मार्गावरील खड्डेमय रस्ते, उमटे धरणातील दुषित पाणी, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांमुळे पर्याय म्हणून या मतदार संघातील मतदारांनी महेंद्र दळवी यांना भरघोस मतांनी निवडून दिले.

1 लाख 11 हजार 946 मते महेंद्र दळवी यांना मिळाले. तर पंडित पाटील यांना 79 हजार 22 मतांनी समाधान मानावे लागले. 32 हजार 924 मतांच्या फरकाने महेंद्र दळवी यांना शेकापच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा फडकविण्यास यश आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com