पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व

मागील वेळेस सेना-भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी अशा तिघांकडे पालघर जिल्हा परिषदेची सत्ता असली तरी यावेळेस झालेल्या राज्यातील सत्ता बदलामुळेपालघर जिल्हा परिषदेत ही महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे
Shivsena Leading in Palghar Zilla Parishad
Shivsena Leading in Palghar Zilla Parishad

पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली असून या निवडणुकीत शिवसेनेच वर्चस्व पाहायला मिळाले.  ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या ५७ तर आठ पंचायत समित्यांच्या ११४ जागांसाठी झाली होती.

मात्र जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५७ पैकी शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १५,  भाजप १०,  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ६, बहुजन विकास आघाडी ४, अपक्ष ३,  तर काँग्रेस ला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. ५७ जागांपैकी बहुमतासाठी २९ जागांची गरज असली तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. 

मागील वेळेस सेना-भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी अशा तिघांकडे पालघर जिल्हा परिषदेची सत्ता असली तरी यावेळेस झालेल्या राज्यातील सत्ता बदलामुळे पालघर जिल्हा परिषदेत ही महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे . जिल्हा परिषदेच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपला मागे टाकण्यात सेना राष्ट्रवादीला यश आल्याचे पहायला मिळते आहे. जिल्हा परिषदेसह झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मोखाडा आणि पालघर या पंचायत समित्या शिवसेनेकडे, तालासरी पंचायत समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे, जव्हार पंचायत समिती भाजपाकडे, विक्रमगड पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उर्वरित डहाणू, वाडा आणि वसई या तीन पंचायत समित्यांवर महाविकास आघाडीला संमिश्र यश आले आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com