भाजप नेत्यांच्या समर्थनार्थ शिवसेना नेतेच आमन सामने

जळगाव जिल्ह्यात भाजपतील दोन नेत्यातील असलेल्या विरोध आता शिवसेनेतही त्याच पध्दतीने विभागला केला आहे. एकनाथ खडसे व गिरीश महाजन अशा दोन गटात शिवसेनेचा विरोध आहे.
भाजप नेत्यांच्या समर्थनार्थ शिवसेना नेतेच आमन सामने

जळगाव - जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात उघड वाद होत असतांना शिवसेनेतही सारे काही आलबेल नाही. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील व सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातही आता उघड मतभेद दिसू लागले आहेत. जिल्हा बॅंकेने खडसे यांच्या मुक्ताईनगर कारखान्याला दिलेले कर्ज आमदार पाटील यांनी योग्य असल्याचे म्हटलेले असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी भूमिका घेत थेट कर्जाच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेतही सद्या एकवाक्‍यता दिसत नाही.

जळगाव जिल्ह्यात भाजपतील दोन नेत्यातील असलेल्या विरोध आता शिवसेनेतही त्याच पध्दतीने विभागला केला आहे. एकनाथ खडसे व गिरीश महाजन अशा दोन गटात शिवसेनेचा विरोध आहे. जळगाव जिल्हा बॅंकेत युती आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील उपाध्यक्ष आहेत. तर शिवसेनेचे पारोळ्याचे माजी आमदार चिमणराव पाटील हे संचालक आहेत. त्यांचा कल मात्र खडसेंच्या बाजूने आहे, तर राज्याचे सहकारमंत्री गुलाबराव पाटील हे खडसेंचे विरोधक आणि भाजपचे सहकार राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे आहेत.

या शिवाय खडसेंचे कट्टर विरोधक शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन व महाजन यांचेही सख्य आहे. महाजन वेळोवेळी जैन यांची भेट घेत असतात. जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असलेल्या महापालिकेतील खानदेश विकास आघाडीला ते सहकार्य करीत असतात. त्यामुळे मंत्री पाटील,जैन गट महाजनांसोबत आहे. शिवसेना नेते व सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बॅंक व खडसे यांच्यावर आरोप केल्यास पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार त्यांना विरोध करण्यासाठी पुढे येत असतात.

जिल्हा बॅंकेतील शेतकरी कर्ज पुनर्गठन प्रकरणावरून खडसे व गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खंडजंगी झाली होती. त्यावेली आमदार किशोर पाटील यांनी थेट खडसे यांची बाजू घेवून गुलाबराव पाटील यांना विरोध केला होता. यावेळी गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बॅंकेच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा काढला होता त्यात आमदार पाटील व पारोळ्याचे माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सहभाग घेतला नाही, विशेष म्हणजे खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली होती. आताही खडसे यांच्या मुक्ताईनगर साखर कारखान्याला दिलेल्या 51 कोटीच्या कर्जावरून भाजपत अंतर्गत वाद सुरू आहे.

भाजपचे नेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कर्ज देण्यावर लेखी हरकत घेतलेली असतांना. जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष असलेले शिवसेनेचे आमदार किशोर पाटील खडसेंच्या मदतीला धावून आले, त्यानी पत्रकार परिषद घेवून साखर कारखान्याला दिलेले कर्ज नियमानुसारच असल्याचे स्पष्टपणे जाहिर केले, जर यात आम्ही दोषी असल्यास आम्हाला शिक्षा करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी शिवसेनेचे नेते व सहकारमंत्री मात्र महाजनांच्या मदतीला धावले त्यांनी त्यांनी महाजनांच्या पत्रानुसार खडसे यांच्या कारखान्याला देण्यात आलेल्या कर्जाची चौकशी करण्यात येईल असे जाहिर केले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या वादात आता शिवसेनेतील फुटही आता उघडपणे समोर येताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com