Shivsena Leaders Brother Enters BJP | Sarkarnama

 शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदेंचे भाऊ गुरुदेव कांदे झाले भाजपवासी! 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 11 जुलै 2019

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांचे बंधु आणि निफाड पंचायत समितीचे उपसभापती गुरुदेव कांदे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेना नेते सुहास कांदे नांदगाव विधानसभेचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे या राजकीय प्रवेशाने नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

नाशिक : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांचे बंधु आणि निफाड पंचायत समितीचे उपसभापती गुरुदेव कांदे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेना नेते सुहास कांदे नांदगाव विधानसभेचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे या राजकीय प्रवेशाने नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

मुंबईत भाजप कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या हा प्रवेश झाला. कांदे जिल्हा परिषद निवडणूकीत विजयी झाले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांचे ते बंधू आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचाच भाऊ भाजपवासी झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या निफाड तालुकाध्यक्षा अश्‍विनी मोगल, मनसेचे जिल्हा सरचिटणीस आशिष फिरोदिया, पंचकेश्‍वरचे सरपंच गणपत ढोमसे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष शरद विधाते, राष्ट्रवादीचे युवानेते हरीश झाल्टे, सुरेखा कुशारे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. 

यावेळी ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, संजय वाबळे आदी उपस्थित होते. जगन कुटे, शिवनाथ कडभाने, राजाभाऊ शेलार, शंकरराव वाघ, लक्ष्मण निकम, विनायक खालकर, दिलीप गिते, रोहित कुटे, गणपत ढोमसे, उत्तम शिंदे, संपत नगारे, संतोष कांदे व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख