वीर सावरकरांचा अपमान करु नका - संजय राऊतांनी घेतले राहुल गांधींना शिंगावर

आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.,,,जय हिंद! असे ट्वीट करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला शिंगावर घेतले आहे. महाराष्ट्रात भाजपची मैत्री तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यानंच आता काँग्रेसला हा 'घरचा आहेर दिला आहे,'
Shivsena Leader Sanjay Raut Takes Congress Leader Rahul Gandhi Head On
Shivsena Leader Sanjay Raut Takes Congress Leader Rahul Gandhi Head On

पुणे : आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.,,,जय हिंद! असे ट्वीट करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला शिंगावर घेतले आहे. महाराष्ट्रात भाजपची मैत्री तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यानंच आता काँग्रेसला हा 'घरचा आहेर दिला आहे,'

'माझं नाव राहुल सावरकर नव्हे तर राहुल गांधी आहे' असे सांगत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आज दुपारी हल्लाबोल केला. दिल्लीतील रामलिला मैदानावर कॉंग्रेसने काढलेल्या भारत बचाव रॅलीत गांधी बोलत होते. यावेळी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी,माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

यावर महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लागोपाठ दोन ट्वीट करत राहुल गांधींना खडे बोल सुनावले. एका बाजूला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी आहे. त्याला विरोध होत आहे. त्यातच मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर करुन घेतले आहे.  त्यामुळे काँग्रेसला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. 

महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन फार दिवस उलटलेले नाहीत. त्यातच शिवसेनेने काँग्रेसला आपला रंग दाखवला आहे. 'सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे' असे सांगत राऊत यांनी काँग्रेसला थेट शिंगावर घेतले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com