गोड बातमी लवकरच मिळेल : संजय राऊत

एनडीएची स्थापना चार प्रमुख नेत्यांनी केली होती, तेव्हाची एनडीए आणि आत्ताचे एनडीए यात खूप फरक आहे, जर तुमचा प्रश्न आहे तुम्हाला एनडीए मधून बाहेर काढले का? तर ते मला ठाऊक नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले.गोड बातमी लवकरच मिळेल, असे वक्तव्यही त्यांनी केले.
Shivsena Leader Sanjay Raut Confident About Forming the Government
Shivsena Leader Sanjay Raut Confident About Forming the Government

मुंबई :  एनडीएची स्थापना चार प्रमुख नेत्यांनी केली होती, तेव्हाची एनडीए आणि आत्ताचे एनडीए यात खूप फरक आहे, जर तुमचा प्रश्न आहे तुम्हाला एनडीए मधून बाहेर काढले का? तर ते मला ठाऊक नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. गोड बातमी लवकरच मिळेल, असे वक्तव्यही त्यांनी केले. 

राऊत म्हणाले, "आता एनडीएचे प्रमुख कोण होत आणि आज कोण आहे? आम्ही पाहिले होते की एनडीएचे निर्णय बसून बोलून घेतला जायचे. आज आम्हाला कळते आहे की दोन्ही सभागृहाचे  शिवसेनेचे सदस्य आहेत त्यांच्या बसण्याच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. आमच्या मनात शंका नाही, तुमच्या मनात का? महाराष्ट्रात सरकार बनतंय त्यात सेनेचा मुख्यमंत्री नेतृत्व करेल. सरकारचं नेतृत्व उद्धव साहेबांनी करावे असं आम्हाला वाटतं. सेना एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार नाही, कारण तसं वातावरण राहीलं नाही, याचं आम्हाला दुःख आहे.''

ते पुढे म्हणाले, "एनडीएच्या स्थापनेत सेनेचा पुढाकार होता. मोठं काम केलं होतं. जॉर्ज फर्नांडिस निमंत्रक होते. एनडीएमध्ये प्रत्येक घटक पक्षांशी संवाद होता. निर्णय घेताना निमंत्रक संवाद साधायचे., पण हा संवादच संपलाय काही वर्षात त्यामुळे एनडीए आहे का? ते अस्तित्वच मुळातून नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय, कोणी एक पक्ष एनडीए नाही. आतापर्यंत सगळे मिळून होते, नंतर मेगा भरती झाली. ज्यांचा काही सबंध नव्हता ते त्यात आले.  ते सर्व जण पेईंग गेस्ट सारखे आहेत.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com