ताकाला जाऊन भांडे लपवायचे कशाला? : पालकमंत्री रामदास कदम यांचा टोला 

पिकांच्या नुकसानीबाबत राज्यपालांची देखील शिवसेनेच्या वतीने भेट घेतली असून सरकार नसल्याने तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलावीत, अशी विनंती केली असल्याचे शिवसेना नेते व नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे सांगितले. सरकार स्थापन झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अडचणी येत आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सरकार नसल्यामुळे अडचणी तर येणारच आहेत. ताकाला जाऊन भांडे लपवायचे कशाला? काय गरज आहे, असा प्रश्नही त्यांनी भाजपचे नाव न घेता उपस्थित केला.
Shivsena Leader Ramdas Kadam Meeting Nanded
Shivsena Leader Ramdas Kadam Meeting Nanded

नांदेड :  पिकांच्या नुकसानीबाबत राज्यपालांची देखील शिवसेनेच्या वतीने भेट घेतली असून सरकार नसल्याने तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलावीत, अशी विनंती केली असल्याचे शिवसेना नेते व नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे सांगितले. सरकार स्थापन झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अडचणी येत आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सरकार नसल्यामुळे अडचणी तर येणारच आहेत. ताकाला जाऊन भांडे लपवायचे कशाला? काय गरज आहे, असा प्रश्नही त्यांनी भाजपचे नाव न घेता उपस्थित केला. 

छोटा आणि मोठा भाऊ कोण? हे ठरत नाही ना? असे विचारल्यानंतर त्यांनी सध्या शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. भाऊ, दादा, माई, आण्णा हे सगळे नंतर असल्याचाही टोला त्यांनी रविवारी (ता. तीन)  लगावला.   
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. त्यामुळे आता पथकाची वाट न पाहता तत्काळ पंचनामे करावेत. नांदेड जिल्ह्यात ३५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पाच दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश  कदम यांनी रविवारी (ता. तीन) दिले.

कदम यांनी सकाळी जिल्हा यंत्रणेतील सर्व अधिकारी व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील नांदेड, नायगाव, बिलोली आणि मुखेड तालुक्यातील जवळपास २० गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

गेल्या २५ वर्षापासून मराठवाड्यातील शेतकरी हा कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाला सामोरे जातो असल्याचे सांगून पालकमंत्री कदम म्हणाले की, अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे हाताला आलेले पिक वाया जात आहे. आता परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली असून आत्तापर्यंत ३५ टक्के पंचनामे झाले आहेत. उर्वरित पंचनामे येत्या पाच दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून मी दररोज त्याचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनेक ठिकाणी पिक विमा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी नाहीत. त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कृषि अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून केलेले पंचनामे कंपनीने ग्राह्य धरावेत, असे शासनाचे आदेश आहेत. कंपनीचे मागचे अनुभव कटू आहेत त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या घरात पावसामुळे दिवाळी साजरी झाली नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील दिवाळीसाठी रजेवर न जाता तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

सोयाबीन आणि कापूस पिकाचे जवळपास शंभर टक्के नुकसान झाले आहे. तसेच हळदीलाही बुरशी लागली आहे आणि केळीचे पिकही वाया गेले आहे. त्यामुळे ही पिके देखील पंचनामे करताना घ्‍यावीत, अशा सूचना आपण केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पिकांच्या नुकसानीचे व्हिडिओ, छायाचित्र काढण्याच्या सूचनाही आपण केल्या आहेत. शेतकऱ्यांनी देखील ते करावेत, जेणेकरुन मदत मिळण्यास अडचणी येणार नाहीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलिस अधीक्षक मगर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, रोहीदास चव्हाण, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, शहरप्रमुख सचिन किसवे आदी उपस्थित होते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com