चिरंजीवांसाठी रामदास कदम दापोलीतच अडकले!

शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे स्टार प्रचारक व शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव योगेश कदम निवडणूक लढवीत असल्याने याच मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत. राज्यात दापोली विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.
Yogesh Kadam - Ramdas Kadam
Yogesh Kadam - Ramdas Kadam

दाभोळ : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे स्टार प्रचारक व शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव योगेश कदम निवडणूक लढवीत असल्याने याच मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत. राज्यात दापोली विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. 

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून रामदास कदम यांनी मंत्रालयातील आपले वजन वापरून दापोली विधानसभा मतदारसंघात बाराशे कोटी रुपयांची विकास कामे गेल्या चार वर्षात मंजूर करून आणली आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांचा मुलगा योगेश कदम याला मतदारानी  निवडून द्यावे, अशी त्यांची  साधी अपेक्षा आहे. मात्र, दापोली विधानसभा  मतदारसंघात पंचवीस वर्ष प्रतिनिधित्व करत असलेले शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांचा पराभव 2014 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी केला. त्यानंतर या मतदारसंघात संजय कदम यांनी मुसंडी मारली व येथील जनतेला आपलेसे केले.

या मतदारसंघात  शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम याना सोपी वाटणारी ही  निवडणूक आता काही सोपी राहिलेली नसून ती प्रतिस्पर्धी उमेदवार संजय कदम यांनी कठीण करून ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघात  तळ ठोकून बसावे लागले आहे. एकेकाळी संपूर्ण राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराची राळ उडविणारे रामदास कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघात जखडून ठेवण्याचे काम राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com