गुलाबराव पाटील रमले कट्टयावरच्या गप्पांत

शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते व जळगाव ग्रामीण मतदार संघातील युतीचे उमेदवार गुलाबराव पाटील निवडणुकीनंतर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यासमवेत कट्यावरच्या गप्पांत रमले होते.
Jalgaon Rural Sena BJP Alliance Candidate Gulabrao Patil in light Mood After Election
Jalgaon Rural Sena BJP Alliance Candidate Gulabrao Patil in light Mood After Election

जळगाव : शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते व जळगाव ग्रामीण मतदार संघातील युतीचे उमेदवार गुलाबराव पाटील निवडणुकीनंतर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यासमवेत कट्यावरच्या गप्पांत रमले होते.

शिवसेना उपनेते व सहकाराज्यमंत्री गुलाबराव पाटील हे कार्यकर्त्यात सहज मिसळून जातात. जळगाव ग्रामीण मतदार संघात त्यांची उमेदवारी आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या पुष्पा महाजन आहेत. तर या मतदार संघात भारतीय जनता पक्षाने बंडखोरी केली असून चंद्रकांत अत्तरदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. युतीत झालेल्या बंडखोरीमुळे जिल्हयात या मतदार संघाकडे अधिक लक्ष आहे. 

मात्र, गुलाबराव पाटील यांनी प्रचारात संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. मतदारांशी थेट संपर्क साधून गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली. त्यामुळे या बंडखोरीचा कोणताही परिणाम होणार नाही, असा त्यांचा दावा आहे. मतदारांच्या विश्‍वासाच्या बळावर आपण मोठ्या मताधिक्‍याने निवडून येणार आहोत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मतदान झाल्यानंतर कोणतेही टेन्शन न घेता, ते मतदार व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. आजही त्यांनी कार्यकर्त्यासमवेत कट्टयावरच्या गप्पा रंगविल्या. अत्यंत दिलखुलासपणे विनोदही केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com