विधानसभेतील पराभवाने खचणार नाही, दुप्पट वेगाने काम करीन : निर्मला गावित

माजी आमदार निर्मला गावित कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, नऊ वेळा नंदुरबार मतदारसंघातून खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. इगतपूरी मतदारसंघात त्यांचा मोठा संपर्क आहे. यंदा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रसच्या विद्यमान आमदार असलेल्या गावित यांनी कार्यकर्ते व हितचिंतकांच्या आग्रहातून, मतदारसंघातील अडलेल्या कामांसाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला
Shivsena Defeated Candidate Nirmala Gavit Resolves to Fight Again
Shivsena Defeated Candidate Nirmala Gavit Resolves to Fight Again

नाशिक : सलग दोन वेळा इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या आमदार राहिलेल्या निर्मला गावित यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. सर्व विरोधकांचा पडद्याआड व प्रचाराच्या मैदानात एकोपा झाल्याने त्यांना फटका बसला. मात्र निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच त्या पुन्हा एकदा जोमाने कार्यरत झाल्या आहेत. मी गेली पंचवीस वर्षे लोकांत वावरते आहे. जनतेची कामे करते आहे. त्यामुळे पराभवाने मी खचणार नाही,  असे त्या म्हणाल्या.

माजी आमदार निर्मला गावित कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, नऊ वेळा नंदुरबार मतदारसंघातून खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. इगतपूरी मतदारसंघात त्यांचा मोठा संपर्क आहे. यंदा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रसच्या विद्यमान आमदार असलेल्या गावित यांनी कार्यकर्ते व हितचिंतकांच्या आग्रहातून, मतदारसंघातील अडलेल्या कामांसाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य हिरामन खोसकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेसचे उमेदवार म्हणनू ते निवडून आले. त्यामुळे इगतपुरी मतदारसंघातील ही लढत राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.

विधानसभा निवडणुक निकालानंतरचा राजकीय धुरळा आता खाली बसला आहे. विजयी उमेदवार विधीमंडळाच्या कामाला लागले आहेत. अशा स्थितीत पराभूतांचे काय? ते काय करताहेत असा प्रश्‍न प्रत्येकाला असतो. मात्र, माजी आमदार निर्नमला गावित यांच्याशी आजही कार्यकर्ते, नागरीक नियमीत संपर्क ठेऊन आहेत. सकाळीच त्या मतदारसंघातील कार्यक्रम, विवाह, अंत्यसंस्कार, दशक्रीया विधी, सांत्वन याला उपस्थिती लावण्यापासून तर अपुर्ण कामांची माहिती घेण्याचे काम करतात. 

त्यांच्याशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ''मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरवात महापालिकेची नगरसेविका म्हणून केली. नाशिकच्या नागरीकांनी दोन वेळा मला नगरसेविका केले. नगरसेविका म्हणून नागरीकांची अगदी लहान सहान कामे करावी लागतात. त्यांच्या अडचणी सोडवाव्या लागतात. लोकांमध्ये राहण्याची सवय मला तेव्हापासून आहे. यंदाच्या निवडणुकीत काही कारणांनी माझा पारभव झाला. तो का झाला याची माहिती घेण्याचे काम मी करीत आहे. मतदारसंघातील कार्यकर्ते, नागरीक अद्यापही रोजच भेटायला येतात. वेगवेगळी माहिती देतात. त्यावर मी विचार करते आहे. मात्र, मी सलग चार वेळा विजयी झाले. एका पराभवाने खचणार नाही. उलट दुप्पट वेगाने लोकसंपर्क ठेवते आहे. तेव्हढ्याच वेगाने जनतेची कामे करणार आहे. पुन्हा लोकांमध्येच वावरते आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com