घाटीतील एक हजार रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली -चंद्रकांत खैरे

लॉकडाऊनच्या काळात शासकीय रुग्णालय अर्थात घाटीमध्ये दाखल असलेल्या एक हजार रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज जेवण पुरवण्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. संपूर्ण एकवीस दिवस या नातेवाईकांना जेवण दिले जाणार असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.
ShivSena helps relatives of patients at government hospital in aurangabad says chandrakant khaire
ShivSena helps relatives of patients at government hospital in aurangabad says chandrakant khaire

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात शासकीय रुग्णालय अर्थात घाटीमध्ये दाखल असलेल्या एक हजार रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज जेवण पुरवण्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. संपूर्ण एकवीस दिवस या नातेवाईकांना जेवण दिले जाणार असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय अर्थात घाटीमध्ये मराठवाडा ,खानदेश, विदर्भ यासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. या रुग्णालयात नेहमीच गोरगरीब रुग्णांची गर्दी असते, शिवाय त्यांच्यासोबत एक किंवा दोन नातेवाईकही असतात.

घाटीत येणारा रुग्ण हा विशेषता ग्रामीण भागातून आलेला असतो अनेक रुग्णांवर महिनो महिने उपचार करावे लागतात, तर काही रुग्णांना शस्त्रक्रियांची गरज भासते. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांची उपासमार होऊ नये यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष घाटीत अन्नदान करत असतात .

सध्या कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.  त्यामुळे घाटीतील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था शिवसेनेकडून केली जात आहे. लॉकडाऊनची घोषणा झाली त्या दिवसापासून , तर 14 एप्रिलपर्यंत म्हणजेच एकवीस दिवस एक हजाराहून अधिक रुग्णांच्या नातेवाईकांना आम्ही भरपेट मोफत जेवण देणार आहोत .

गर्दी टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळत हे काम सुरू राहणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नाची पाकीट देण्यापूर्वी सॅनटायझरने त्यांचे हात स्वच्छ धुऊन मगच त्यांना अन्न दिले जात आहे.

घाटीतील रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक उपाशी राहू नये याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली असून फक्त सोशल डिस्टन्स , स्वच्छता आणि शासनाचे नियम पाळून लोकांनी साथ द्यावी असे आवाहन चंद्रकांत खैरे यांनी केले. 

रुग्णांना अन्न पुरवण्याच्या कामात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत असल्याचेही खैरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com