शेतकऱ्यांसाठी शिवसेना सरसावली; जिल्ह्यात मदत केंद्र सुरू

शेतकऱ्यांसाठी शिवसेना सरसावली; जिल्ह्यात मदत केंद्र सुरू

औरंगाबाद : मुंबईतून आपापल्या मतदारसंघात परतल्यानंतर शिवसेना आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तातडीने काम सुरू केल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपासून पीक विमा व अन्य कृषी योजनांच्या लाभासाठी शिवसेनेने मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानूसार शिवसेनेचे सर्व आमदार बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत असून आज कन्नड मतदारसंघात शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अजून सुटला नसला तरी मुंबईत आठवडाभरापासून थांबून असलेल्या शिवसेना आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नुकतेच दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही आमदार परतले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा प्रशासनाकडून घेतला. 

परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिकं गेल्याने शेतकरी उदध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात येत आहे. याची सुरूवात सिल्लोड मतदारसंघात याआधीच आमदार अब्दुल सत्तार यांनी केली होती. त्यानंतर आज आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते कन्नड येथे शेतकरी मदत केंद्र व तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात आले. 

याठिकाणी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झालेले नुकसान, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पीक विम्याचे प्रश्न, कर्जमाफीचे प्रश्न यासह प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आदींचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल. असेच मदत केंद्र जिल्ह्यातील अनेक भागात देखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने कळवण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com