शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला : प्रसाद लाड 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, शिवसेनेने 2014 मध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्याच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळत आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
Prasad Lad bjp
Prasad Lad bjp

रत्नागिरी : आम्हाला फसवल गेलं, ही शिवसेनेची वल्गना आता खोटी ठरली आहे. शिवसेनेने दिशाभूल केली आहे. शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मनात आघाडी करायची होती, तर भाजपला सांगायला हवं होतं, असा उपदेश भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेला केला आहे.


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, शिवसेनेने 2014 मध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्याच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळत आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.


 सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेनेवर प्रसाद लाड यांनी उपहासात्मक टीका केली.  ते म्हणाले, निवडणुकीच्या आधी सावरकरांच्या मुद्यावर कंबरडे मोडायची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रेमाचा सल्ला दिला आहे. आता सत्तेसाठी लाचार झालेल्या मुख्यमंत्र्यांनी कंबरड्यात लाथ घालू नये, फक्त तोंड उघडून बोला की, सावरकर आमचा अभिमान आहे, अशी खोचक टीका लाड यांनी केली आहे. 


सावरकरांबद्दल निर्भिडपणे बोलणाऱ्या खासदार संजय राऊतांचे लाड यांनी कौतुक करत अभिनंदन केलं आहे.


रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व प्रशासन दोघांच्या सहकाऱ्यातून प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. दापोली येथील स्मशानभूमीसाठी आणि रस्त्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार प्रसाद लाड यांनी पालकमंत्री ऍड. अनिल परब यांच्याकडे केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com