शिस्तीचे वळण उदयनराजेंना लागत आहे, अभिनंदन!

शिस्तीचे वळण उदयनराजेंना लागत आहे, अभिनंदन!

पुणे : साताराचे राष्ट्रवादीचे खासदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत काहूर माजले आहे. शिवसेनेने भाजपला इशारा देण्यासोबत उदनयराजेंनाही कानपिचक्या दिल्या आहेत. शिवसेनेने हे इतक्या तीव्र पद्धतीने व्यक्त केले आहे की या दोन मित्रपक्षांतील खडाखडी काय सांगते आहे, यावर आता राज्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.

बरे ही टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या `सामाना`तून झाल्याने ते उद्धव ठाकरे यांचेच मत असल्याचे मानले जात आहे. ``उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे 'मोहरे' म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,' अशी `सामना`च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.


'शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता आणि साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत, असाही सल्ला उदयनराजेंना देण्यात आला आहे. 

इतर नाट्यछटांचे प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!, असा उपरोधिक टोलाही लगावण्यात आला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com