लोणावळ्यात नगर परिषदेत शिवसेनेचा भाजपला धक्का

नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेने अपक्षांच्या साथीत भाजपला धक्का देत दोन, तर एका सभापतिपदी अपक्षाने बाजी मारली
Shivesena Givas Jolt to Bjp in Lonavala
Shivesena Givas Jolt to Bjp in Lonavala

लोणावळा : नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेने अपक्षांच्या साथीत भाजपला धक्का देत दोन, तर एका सभापतिपदी अपक्षाने बाजी मारली.

बांधकाम समितीवर शिवसेनेचे सुनील इंगुळकर, स्वच्छता व आरोग्य समिती सभापतिपदी सिंधू परदेशी यांची, तर पाणी समिती सभापतिपदी अपक्ष सेजल परमार यांनी चार विरुद्ध तीन मतांनी विजयी झाले. महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी भाजपच्या अपर्णा बुटाला व शिक्षण समिती सभापतिपदी कॉंग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. 

नगर परिषदेत भाजप आणि कॉंग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. विषय समित्यांची मुदत संपत असल्याने शुक्रवारी (ता. 17) विषय समित्या व सभापती निवडीसाठी तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी मधुसूदन बर्गे यांच्या उपस्थितीत निवडीची प्रकिया पार पडली. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार उपस्थित होते. सदस्य निवडीनंतर सभापती पदांसाठी रंगतदार चित्र पाहावयास मिळाले. बांधकाम समितीसाठी शिवसेनेचे सुनील इंगुळकर व आरपीआयचे नगरसेवक दिलीप दामोदरे, पाणीपुरवठा समितीसाठी कॉंग्रेसचे सुधीर शिर्के व अपक्ष नगरसेविका सेजल परमार यांच्यात, तर आरोग्य समिती सभापतिपदासाठी भाजपचे देविदास कडू व शिवसेनेच्या सिंधू परदेशी यांच्यात लढत झाली.

भाजपचे दोन नगरसेवक गैरहजर
निवडणुकीदरम्यान भाजपचे माजी गटनेते नगरसेवक भरत हरपुडे, नगरसेविका जयश्री आहेर यांनी दांडी मारली, तर एकाने विरोधात मतदान केले. त्यामुळे भाजपचा सहयोगी पक्ष आरपीआयसह कॉंग्रेस व भाजपच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. 

निवड पुढीलप्रमाणे :

स्थायी समिती - सुरेखा जाधव, नगराध्यक्षा (सभापती), श्रीधर पुजारी, सुनील इंगुळकर, आरोही तळेगावकर, सेजल परमार, सिंधू परदेशी, अपर्णा बुटाला, राजू बच्चे, पूजा गायकवाड, नितीन आगरवाल. 

नियोजन व विकास समिती - श्रीधर पुजारी (सभापती), निखिल कवीश्‍वर, संजय घोणे, माणिक मराठे, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, मंदा सोनवणे. 

बांधकाम समिती - सुनील इंगुळकर (सभापती), दिलीप दामोदरे, भरत हरपुडे, गौरी मावकर, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल, अंजना कडू, कल्पना आखाडे. 

शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती - आरोही तळेगावकर (सभापती), भरत हरपुडे, ब्रिंदा गणात्रा, जयश्री आहेर, संध्या खंडेलवाल, शादान चौधरी, कल्पना आखाडे, अंजना कडू. 

पाणी व जलनिस्सारण समिती - सेजल परमार (सभापती), गौरी मावकर, रचना सिनकर, जयश्री आहेर, सुधीर शिर्के, सुवर्णा अकोलकर, शादान चौधरी, कल्पना आखाडे. 

स्वच्छता व आरोग्य समिती - सिंधू परदेशी (सभापती), देविदास कडू, भरत हरपुडे, संजय घोणे, पूजा गायकवाड, शादान चौधरी, अंजना कडू, गौरी मावकर. 

महिला व बालकल्याण समिती - अपर्णा बुटाला (सभापती), अंजना कडू, रचना सिनकर, जयश्री आहेर, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल, कल्पना आखाडे, नितीन आगरवाल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com