शिवसेनेकडून केवळ स्थगितीचे राजकारण : निरंजन डावखरे

भाजपाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने पुढील आठवडयात मंगळवारी आंदोलन केले जाणार आहे. यावेळी डावखरे यांनी शिवसेनेच्या सरकारची स्थगिती सरकार म्हणून संभावना केली
Shivsena Playing Politics of Stay Allege Niranjay Davkhare
Shivsena Playing Politics of Stay Allege Niranjay Davkhare

ठाणे : राज्यातील 'स्थगिती' सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्बन फॉरेस्ट व विज्ञान केंद्राचे भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनालाच महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने स्थगिती दिली, अशी टीका शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली. यापुढे पक्षप्रमुखांना बोलाविण्याआधी शिवसेनेच्या नेत्यांनी आपली भूमिका निश्‍चित करायला हवी. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भूमिपूजनाचा फलक शिवसेना काढून टाकणार का, असा प्रश्न देखील डावखरे यांनी उपस्थित केला आहे.

भाजपाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने पुढील आठवडयात मंगळवारी आंदोलन केले जाणार आहे. यावेळी डावखरे यांनी शिवसेनेच्या सरकारची स्थगिती सरकार म्हणून संभावना केली. तसेच हे सरकार केवळ राज्यात स्थगितीचे राजकारण करीत नसून स्थानिक पातळीवर देखील स्थगितीचे राजकारण करीत असल्याची टिका केली.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी झोपडीवासियांना पाचशे चौरस फूटांचे घर देण्याची घोषणा केली होती. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने पाचशे चौरस फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात माफीची घोषणा केली होती, या घोषणांचे काय झाले, असा सवाल निरंजन डावखरे यांनी केला.

क्‍लस्टरमधून गावठाणे व कोळीवाड्यांना वगळण्याची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मात्र, हाजुरी गावठाणाचा प्रकल्पात समावेश करण्यात आला. महाआघाडी सरकारकडून अन्याय केला जात असल्याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. कळवा-ऐरोली रेल्वेमार्गाच्या कामात विस्थापित होणाऱ्या कुटुंबांचे गायमुख येथे पुनर्वसन केले जाणार आहे. या कुटुंबांची नोकरी व मुलांचे शिक्षण कळवा-ऐरोली परिसरात सुरू आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन कळवा परिसरातच करावे, अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. 

दिवा परिसरातील डंपिंग ग्राऊंडवर कचरा जाळला जात असून, दुर्गंधीचा त्रास होत आहे. या विषयावर महापालिकेने वेळेत उपाययोजना केली नाही तर त्याचा जाब विचारण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तर दिवा गावातील लोकांचे हक्काचे पाणी बिल्डरकडे वळविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र अशा कामांचे उत्तर सत्ताधारी शिवसेनेला द्यावे लागणर असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com