shivsena doesnt pay attention to thakur | Sarkarnama

रामदास ठाकूर शिवसेनेकडून अद्याप बेदखलच

विलास काटे
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

आळंदी :  विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप बराच अवधी असला तरी खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी खेड विधानसभेसाठी सेनेच्यावतीने इच्छूक म्हणून शड्डू ठोकला खरा पण शिवसेनेवाले त्यांना सहजासहजी समावून घेतील का असा प्रश्न आता तालुक्यात चर्चिला जात आहे.

आळंदी :  विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप बराच अवधी असला तरी खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी खेड विधानसभेसाठी सेनेच्यावतीने इच्छूक म्हणून शड्डू ठोकला खरा पण शिवसेनेवाले त्यांना सहजासहजी समावून घेतील का असा प्रश्न आता तालुक्यात चर्चिला जात आहे.

कारणही तसेच आहे. सोमवारी (ता.२२) राजगुरुनगरला पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र सेनेच्या बॅनरवर  ठाकूर यांचा फोटो दिसत नसल्याचे चित्र आहे. खुद्द ठाकूर यांच्या सोळू गावातही शिवसैनिकांनी त्यांचे छायाचित्र टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ठाकूर यांचा दावा कितपत गंभीर आहे, याचीच शंका निर्माण झाली आहे.

मागील निवडणुकीत आमदार सुरेश गोरे यांच्यासाठी जिल्हाप्रमुख राम  गावडे आणि रामदास ठाकूर यांनी माघार घेतली होती अशी चर्चा ठाकूर यांच्याकडून केली जात आहे. परंतु आता माघार नाही. निवडणूक लढणारच या पवित्र्यात रामदास ठाकूर आहेत. नुकतेच त्यांच्या सोळू गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी वर्चस्व मिळविले. ही एकमेव बाब त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

 
नवरात्रीच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक गावांशी संपर्क साधून ठाकूर यांनी निवडणूकीस इच्छूक असल्याचे सांगत आहे. त्यातून ठाकूर यांचे नाव चर्चेत आले. मात्र शिवसेना मात्र त्यांना सहज स्वीकारेल का, असा प्रश्न आता तालुक्यात चर्चिला जात आहे. कारणही तसेच आहे. ठाकूर यांनी यापूर्वी सन २००९ ची निवडणूक अपक्ष लढविली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.

त्याला आता बरेच वर्षे झाली. त्यामुळे पुन्हा निवडणूकीसाठी उभारणी करताना त्यांना पक्षातर्फे उमेदवारी हवी असून तसा जनसंपर्कही करत आहेत. मात्र गेली नऊ वर्षांत त्यांनी कोणत्याच पक्षाशी संबंध ठेवला नाही आणि पक्षाचे कामही केले नाही. निवडणूक आली की पक्षाची दारे ठोटावयाची आणि मला तिकिट द्या म्हणायचे या भूमिकेमुळे सध्या ठाकूर यांना पक्षातील कार्यकर्ते सहजासहजी स्विकारताना दिसत नाही. मात्र ठाकूर यांनीही त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख