तानाजी सावंतांच्या मुद्यावरून शिवसेनेत दोन गट

...
tanaji sawant issue
tanaji sawant issue

मंगळवेढा : तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळात समावेश न केल्यावरुन जिल्हयातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला पण मंगळवेढयातील जुन्या शिवसैनिक पक्षप्रमुखाच्या निर्णयांच्या पाठीशी असून सत्तेचा लाभ घेवून पक्ष वाढीचे काम व तालुक्याचे प्रश्नाबाबत थेट मुख्यमंत्राला भेटणार असल्याची भूमिका सोशल मिडीयातून मांडली.

राज्यात शिवसेनेची सत्ता येवून मंगळवेढयात जल्लोष करण्यापलिकडे काही झाले नाही. उलट राज्यातील सत्तेचा उपयोग करत मंगळवेढयातील बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजना,बसवेश्वर स्मारक,रखडलेला दुष्काळ निधी,संतनगरीला तिर्थक्षेत्राचा दर्जा देणे आदीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार सांगत जनतेत जाणे अपेक्षित होते. राज्यातील सत्तेचा उपयोग करुन दिलासा देण्याची अपेक्षा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून होती. पण त्यांनी याबाबतची वतृव्ये न करता केवळ तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळात समावेश केला नसल्याच्या कारणावरुन राजीनामा दिला.

मंगळवेढयाच्या पाणी प्रश्न जनजागृतीत प्रा. येताळा भगत यांचे योगदान होते. पण सत्ता नसल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. येथील लोकप्रतिनिधी नसताना जि.प.सदस्या शैला गोडसे यांनी चळवळ गतीमान करताना प्रत्यक्ष स्वतः आंदोलनात सहभाग घेतला. तालुक्यातील शिवसैनिकाबरोबर नागरिकात गोडसे यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. तालुक्यातील नव्या शिवसैनिकांची मोट बांधत पदाधिकारी निवडीबरोबर शहर व ग्रामीण भागात शाखेच्या माध्यमातून संपर्क वाढविला.

विधानसभेची जागा युतीत रयत क्रांती पक्षाला गेल्यामुळे गोडसे यांना थांवावे लागले. तरी राज्यातील सत्तेमुळे गोडसे या देखील या भागातील प्रश्नाला न्याय देवू शकल्या असत्या पण; त्यांनी आ. सावंतासाठी सत्ता असताना पदत्याग केला. राज्यातील सत्तेचा लाभ घेवून तालुक्यातील प्रश्नाला न्याय देण्याय्रा शिवसेना पदाधिकाऱ्यांची गरज तालुक्याला आहे.

तीन पक्षांच्या सरकारमध्ये पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांची तारेवरची कसरत आहे. तरीही पक्षसंघटनेत काही पदाधिकारी बेबनाव निर्माण करत आहेत. पक्षाची शिस्त आणि कार्यपद्धती व परंपरा याचा विचार न करता पदाचा गैरवापर करत पक्षप्रमुखाच्या विरोधात व्यक्तीप्रेम दाखवत आहे. शिवसैनिकांनी पक्षप्रमुखाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.तालुक्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच शिष्टमंडळ घेवून भेटणार आहे,
येताळा भगत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com